भारतीय संस्कृती – आपली ओळख, आपली ताकद

आज अनेक लोक पाश्चात्य संस्कृतीच्या दिशेने धावत आहेत.

चमक-दमक, फॅशन आणि,आधुनिकतेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

*पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे*

*सूर्य जेव्हा पश्चिमेकडे जातो, तेव्हा तो मावळतो.*

*त्याचप्रमाणे, आपला समाज जर पाश्चात्य अंधानुकरणात हरवला,*

*तर आपली ओळख, आपली मुळे आणि आपला आत्मा हरवेल.*

*परंतु अभिमानाची गोष्ट म्हणजेआजही आपल्या भारतात असे असंख्य लोक आहेत*

*जे आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांना जिवापाड जपत आहेत.हेच लोक या महान संस्कृतीचे खरे रक्षक आहेत.*

 

*आपली भारतीय संस्कृती ही केवळ पोशाख, सण किंवा रीतिरिवाजांपुरती मर्यादित नाही,*

*ती एक जीवनदर्शन आहे* *जी सत्य,करुणा, अहिंसा, आदर आणि कुटुंबबंध या पायाावर उभी आहे.*

*ही संस्कृती आपल्याला शिकवते की खरी प्रगती भौतिक संपत्तीत नाही,*

*तर चरित्र, सेवा आणि सच्च्या कर्मात आहे.*

 

*आजकालचा काळ बदलत चालला आहे*

*कपड्यांमध्ये अंगप्रदर्शन आणि उघडेपणाची होड वाढत आहे,*

*तरुण-तरुणींचे एकमेकांप्रती आकर्षण मर्यादेच्या सीमारेषा ओलांडत आहे.*

*हे आकर्षण क्षणिक आहे, पण त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजावर उमटतात.*

*जिथे कधी संकोच आणि संस्कार हे अभिमानाचे प्रतीक होते,*

*तिथे आज फॅशन आणि दिखावा यांनी संस्कृतीचा गाभा हादरवला आहे.*

*त्याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे*

*आजची तरुण पिढी मोठ्यांचा सन्मान विसरत चालली आहे,*

*आई-वडिलांची सेवा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव कमी होत चालला आहे.*

*ज्या संस्कृतीने आपल्याला “मातृदेवो भव, पितृदेवो भव” असा दिव्य संदेश दिला,*

*त्याच संस्कृतीत आज आई-वडील वृद्धाश्रमात पोहोचत आहेत*

*ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर समाजाची हार आहे.*

 

*पण आपण विसरू नये की जोपर्यंत भारतीय संस्कृतीचा दीप आपल्या अंतःकरणात प्रज्वलित आहे,*

*तोपर्यंत अंधार कितीही गडद असला तरीही ही संस्कृती कधीच मावळणार नाही.*

*हो, आजची तरुण पिढी पाश्चात्यतेकडे आकर्षित होत आहे,*

*परंतु जेव्हा त्यांना जीवनाचा खरा अर्थ उमजेल,*

*तेव्हा ते पुन्हा परत येतील त्या संस्कृतीच्या कुशीत*

*जिथे आईची माया, वडिलांचे आशीर्वाद, गुरूचा सन्मान आणि मर्यादेचे मूल्य जपले जाते.*

 

*आपली संस्कृती हा भूतकाळ नाही,तर सजीव चेतना आहे*

*जी प्रत्येक मंदिराच्या घंटीत, प्रत्येक वेदाच्या मंत्रात,प्रत्येक कुटुंबाच्या प्रार्थनेत आणि प्रत्येक बालकाच्या निरागसतेत आजही धडकत आहे.*

*जो आपल्या मुळांशी जोडलेला आहे,*

*त्याला कोणतीही वादळे, आकर्षणे किंवा प्रलोभने डगमगवू शकत नाहीत.*

*आपली भारतीय संस्कृती सदैव अमर राहील,*

*कारण ती धर्म नव्हे तर जीवनाचा सार आहे.*

*भारतीय राहणे, हीच खरी प्रगती आहे!*

*✍️राजेंद्र सिंघ शाहू

7700063999 इलेक्ट्रिकल ट्रैनंर, नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!