आज अनेक लोक पाश्चात्य संस्कृतीच्या दिशेने धावत आहेत. चमक-दमक, फॅशन आणि,आधुनिकतेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. *पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे* *सूर्य जेव्हा पश्चिमेकडे जातो, तेव्हा तो मावळतो.* *त्याचप्रमाणे, आपला समाज जर पाश्चात्य अंधानुकरणात हरवला,* *तर आपली ओळख, आपली मुळे आणि आपला आत्मा हरवेल.* *परंतु अभिमानाची गोष्ट म्हणजेआजही आपल्या भारतात असे असंख्य लोक आहेत* *जे आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांना जिवापाड जपत आहेत.हेच लोक या महान संस्कृतीचे खरे रक्षक आहेत.* *आपली भारतीय संस्कृती ही केवळ पोशाख, सण किंवा रीतिरिवाजांपुरती मर्यादित नाही,* *ती एक जीवनदर्शन आहे* *जी सत्य,करुणा, अहिंसा, आदर आणि कुटुंबबंध या पायाावर उभी आहे.* *ही संस्कृती आपल्याला शिकवते की खरी प्रगती भौतिक संपत्तीत नाही,* *तर चरित्र, सेवा आणि सच्च्या कर्मात आहे.* *आजकालचा काळ बदलत चालला आहे* *कपड्यांमध्ये अंगप्रदर्शन आणि उघडेपणाची होड वाढत आहे,* *तरुण-तरुणींचे एकमेकांप्रती आकर्षण मर्यादेच्या सीमारेषा ओलांडत आहे.* *हे आकर्षण क्षणिक आहे, पण त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजावर उमटतात.* *जिथे कधी संकोच आणि संस्कार हे अभिमानाचे प्रतीक होते,* *तिथे आज फॅशन आणि दिखावा यांनी संस्कृतीचा गाभा हादरवला आहे.* *त्याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे* *आजची तरुण पिढी मोठ्यांचा सन्मान विसरत चालली आहे,* *आई-वडिलांची सेवा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव कमी होत चालला आहे.* *ज्या संस्कृतीने आपल्याला “मातृदेवो भव, पितृदेवो भव” असा दिव्य संदेश दिला,* *त्याच संस्कृतीत आज आई-वडील वृद्धाश्रमात पोहोचत आहेत* *ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर समाजाची हार आहे.* *पण आपण विसरू नये की जोपर्यंत भारतीय संस्कृतीचा दीप आपल्या अंतःकरणात प्रज्वलित आहे,* *तोपर्यंत अंधार कितीही गडद असला तरीही ही संस्कृती कधीच मावळणार नाही.* *हो, आजची तरुण पिढी पाश्चात्यतेकडे आकर्षित होत आहे,* *परंतु जेव्हा त्यांना जीवनाचा खरा अर्थ उमजेल,* *तेव्हा ते पुन्हा परत येतील त्या संस्कृतीच्या कुशीत* *जिथे आईची माया, वडिलांचे आशीर्वाद, गुरूचा सन्मान आणि मर्यादेचे मूल्य जपले जाते.* *आपली संस्कृती हा भूतकाळ नाही,तर सजीव चेतना आहे* *जी प्रत्येक मंदिराच्या घंटीत, प्रत्येक वेदाच्या मंत्रात,प्रत्येक कुटुंबाच्या प्रार्थनेत आणि प्रत्येक बालकाच्या निरागसतेत आजही धडकत आहे.* *जो आपल्या मुळांशी जोडलेला आहे,* *त्याला कोणतीही वादळे, आकर्षणे किंवा प्रलोभने डगमगवू शकत नाहीत.* *आपली भारतीय संस्कृती सदैव अमर राहील,* *कारण ती धर्म नव्हे तर जीवनाचा सार आहे.* *भारतीय राहणे, हीच खरी प्रगती आहे!* *✍️राजेंद्र सिंघ शाहू 7700063999 इलेक्ट्रिकल ट्रैनंर, नांदेड* Kanthak Suryatal Post Views: 763 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एन्काऊंटरचा राजा की अवैध्य संपत्तीचा बादशहा? आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले