नांदेड(प्रतिनिधी)-शहरात संत दासगणु पुलानंतर सिडकोकडे जाणार्या रस्त्यावर अग्रसेन भवनाचे काम सुरू आहे. त्यात आज एक कामगार तिसर्या मजल्यावरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. शहरात मोक्याच्या जागेवर असलेली अग्रसेन भवनाची जागा घेवून केतन नागडा याने संत दासगणु पुलाजवळ अग्रसेन भवनाला जागा दिली. प्राप्त माहितीनुसार त्या जागेवर बांधकाम करून देण्याची जबाबदारी सुध्दा केतन नागडाची होती. अनेक दिवस रखडेलेले हे काम सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी बाथरुममध्ये नळफिटींग करणारा कामगार सय्यद तालेब अली सय्यद मुस्ताक अली (27) रा.समीराबाग नांदेड हा काम करत असतांना तिसर्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच मरण पावला. या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. त्या ठिकाणी जाणारे काही जण सांगत होते. त्या ठिकाणी एक सेवानिवृत्त पोलीस आला होता आणि पत्रकारांबद्दल सुध्दा वाईट बोलत होता. पण हा पोलीस कोणासाठी आला होता याची माहिती आजतरी समजली नाही. Kanthak Suryatal Post Views: 927 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मयत मुलाच्या नावाचे 18 लाख रुपये सुनबाई आणि नातीला न सांगता काढून घेतले; गुन्हा दाखल ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचे नि:शुल्क प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज करण्यास 5 नोव्हेंबर मुदत