दोन पोलीस उपनिरिक्षकांसह नऊ जण नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक, तीन पोलीस हवालदार आणि एक पोलीस शिपाई असे नऊ जण सेवानिवृत्त झाले. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात सहकुटूंब सन्मान करुन निरोप देण्यात आला.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक अशोक शिवराज देशमुख (वाचक पोलीस अधिकक्षक नांदेड), पोलीस उपनिरिक्षक अर्जुनसिंह गणेशसिंह ठाकूर(शहर वाहतूक शाखा), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक शिवशंकर कुमरय्या नंदे (पोलीस ठाणे अर्धापूर), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भारत मधुकर लोसरवार (पोलीस ठाणे भोकर), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नामदेव तुकाराम केरले(पोलीस मुख्यालय), पोलीस हवालदार जसबिरसिंघ दर्शनसिंघ बल (पोलीस मुख्यालय), संजय चांदोबा सर्जे(मोटार परिवहन विभाग) आणि पोलीस शिपाई रामचंद्र मुरलीधर जोशी (पोलीस ठाणे अर्धापूर) यांनी आपल्या पोलीस सेवेतील विहित सेवाकाळ पुर्ण केला.
आज —- यांच्या उपस्थितीत या सर्वांना शाल,श्रीफळ आणि भेट वस्तु देवून त्यांचा सहकुटूंब सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी अनेक पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी—— यांनी मेहनत घेतली.
