सन्माननीय CJI गवई यांचे वरील बूट फेकीचा धिक्कार! 

 

सन्माननीय cji, बूट फेकणारा वर कारवाई न करण्याबद्दल कुणाला घाबरले? फेकलेला बूट, की तिवारी नावाच्या वकील व्यक्तीला, की सनातन धर्माला? की त्याच्या ब्राह्मण असल्या सारख्या वागण्याला?

आम्ही या घटनेचा धिक्कार केला पण आदरणीय सीजेआय यांनी गुन्हेगाराला माफ केले! भर कोर्टात अनवधानाने मोबाईलची रिंग वाजली तरी कोर्टाचा अपमान झाला असे समजून कारवाई होते. इथे तर जाणून बुजून बूट फेकून मारला. गुन्हा करणारा सात वर्ष वयापेक्षा कमी असेल किंवा ठार वेडा असेल,….., तर तो गुन्हा ठरत नाही. पण तसे काही नव्हते. गुन्हेगाराने आपला गुन्हा मान्य केला व त्यामागे दैवी शक्ती असल्याचे जाहीर केले. आरोपीचा बचाव हा कायद्याच्या कक्षेत बसत नाही. सन्माननीय कोर्ट यांनी ’कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ याखाली गुन्हेगाराला शिक्षा करायला हवी. तसेच सरकारी कामात अडथळा आणणे,…..,ते देश द्रोही कृत्य करणे अशा सारख्या कलमा खाली गुन्हा नोंद करायला पाहिजे.आदरणीय न्यायाधीशांनी उच्चारलेले वाक्य योग्य की अयोग्य याचे विवेचन करायला हवे.

बूट फेकला तो आदरणीय सी जे आय वर. राज्य घटनेचा योग्य अर्थ सांगून ती अबाधित राखणाऱ्या वर . तो फेकला घटना लिहिणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारावर, अनुयायावर,…..!

*गुन्हेगाराला माफ केले हा मोठेपणा नाही. तो cji यांचा डरपोकपणा आहे! ती भारतीय इतिहासातील मोठी घोडचूक ठरेल. बहुजन समाज मूळनिवासी यांचा अपमान ठरेल. पराभव ठरेल.

* गवई कुटुंबातील हे सुखवस्तू कायदा तज्ञ कशाला घाबरले? नोकरी जाईल म्हणून? आणि नोकरी गेली तर राहायला छत मिळणार नाही याला? की चूल पेटणार नाही याला? यातलं काहीच होणार नाही !

भारतातील सगळे ब्राह्मण पूर्वीच्या महार जमातीवर हल्ले करतील याची भीती वाटते का? मुळीच नाही. कारण ब्राह्मण ही खूप घाबरट जमात आहे. महार रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे तशी ब्राह्मण रेजिमेंट स्थापन झालीच नाही.

आदरणीय सीजेआय गवई सर आपणास विनंती की आपण बूट फेकणाऱ्या तिवारीवर कायद्याच्या कलमानुसार स्वतः पुढाकार घेऊन कारवाई करावी. त्यात भारतीय राज्यघटना, बाबासाहेब आंबेडकरा सारखे असंख्य महामानव, बहुजन व मूळ निवासी समाज यांचे हित दडलेले आहे. मला आपणास सांगण्याचा अधिकार असा की गेली तीस वर्ष मी या ब्राह्मणवादा विरुद्ध सरकारी नोकरीत असताना व निवृत्तीनंतरही लढा देत आहे. भूषण गवई जी, तुम्ही आम्ही इथले मूळ निवासी. गाव गाड्यात तुमच्या पूर्वजांना महार म्हणून ओळखले जाई. गांधीबाबांनी चले जाव ची घोषणा दिली . बाबासाहेब व सहकार्यांनी आपली राज्यघटना लिहिली. त्यामुळे तुम्ही आम्ही शिकलो. तुम्ही तर सर्वोच्च पद मिळविले. आपल्याला आणखी काय हवे? शिवाय आपली लढाऊ जमात आहे. मग तुम्ही आपल्या अस्मितेवर जोडा फेकणाऱ्या ब्राह्मणवादी विचाराच्या व्यक्तीविरुद्ध स्वतः कारवाई करून तसेच फिर्याद देऊन कायद्याचे राज्य Rule of law आहे हे का दाखवून देत नाही? तुम्ही तसे केले नाही तर सर्व बहुजन व मूळ निवासींचा अपमान आहे. इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही.

–सुरेश खोपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!