नरेंद्र मोदींना जमले नाही ते भगवंत मान यांनी केले;शेकडो ट्रोलिंगकरांवर गुन्हे दाखल

बूट उडाला न्यायासनावर, आणि सरकारने झाकून घेतली डोळ्यांवरची रुमाल!  

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला न्यायमूर्ती भूषण गवई यांनी माफ केले. मात्र, त्यांच्या आई आणि बहिणी दोघींनी जाहीर केले की, “आमच्या भावाने आणि मुलाने त्याला माफ केले असले तरी त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे. कारण हा हल्ला केवळ आमच्या मुलावर किंवा भावावर नव्हता, तर तो हल्ला भारतीय संविधानावर होता.”याच घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका जाहीर सभेत प्रश्न विचारला की, “जर बूट फेकणाऱ्याचे नाव ‘अफजल’ असते, तर त्याला अटक झालीच असती आणि कदाचित मलाही अटक झाली असती. मात्र त्याचे नाव राकेश किशोर असून, त्याचे खरे नाव राकेश तिवारी आहे.”असे घडले नाही. ओवेसी सांगतात कि तो राकेश तुमचा बाप आहे कि जावई आहे.

राकेश तिवारीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘मी असे का केले’ याचे विश्लेषण दिले. ANI या वृत्तसंस्थेने ती मुलाखत चांगल्या पद्धतीने घेतली आणि ती प्रसारितही केली. त्यानंतर अनेकांनी सरन्यायाधीशांवर सोशल मीडियावर ट्रोलिंग केले. त्या ट्रोलिंगला प्रचंड प्रतिसादही मिळाला.या संपूर्ण प्रकरणात जे पावले केंद्र सरकार किंवा दिल्ली सरकारने उचलायला हवी होती, ती त्यांनी उचललेली नाहीत. उलट, पंजाब सरकारने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १०० हून अधिक हँडल्सवर भारतीय दंड संहितेतील (BNS) विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

बेंगळुरु पोलिसांनीसुद्धा राकेश किशोर उर्फ राकेश तिवारी याच्याविरुद्ध ‘शून्य क्रमांकाची’ एफआयआर नोंदवून तो तपास पुढे दिल्ली पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांसमोरही ही केस डोकेदुखी ठरू शकते.खरे तर ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असती, तर ती अधिक प्रभावी ठरली असती. पण त्यांनी काहीही केले नाही. मात्र, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे धाडसी पाऊल उचलले.

 

याच दरम्यान अजित भारती नावाच्या ट्रोल आर्मीतील सदस्याने, आणि त्याच्या समर्थकांनी सरन्यायाधीशांविरोधात अत्यंत अपमानास्पद भाषेत व्हिडीओ आणि पोस्ट्स टाकल्या. त्यामुळे भगवंत मान यांच्या सरकारने अजित भारतीसह शंभराहून अधिक सोशल मीडिया हँडल्सवर गुन्हे दाखल केले आहेत.अजित भारतीने या संपूर्ण कारवाईवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिले की, “हा कायदा तुमच्यामुळे अस्तित्वात आला. मग पंजाब सरकारला अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार कसा? मी पंजाबमध्ये राहत नाही, न्यायालयही तिथे नाही.”तसेच, अजित भारती आता सुवर्ण आणि ब्राह्मण समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत आहे आणि सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळतो आहे.

या संपूर्ण प्रकरणात अजित भारती, अनिरुद्ध आचार्य यांच्याविरुद्ध महाअभिवक्ता कार्यालयात तक्रारी दाखल झाल्या आहेत. पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कारण अशा प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी सरकारकडून ऑटोर्नी जनरलची मान्यता आवश्यक असते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूटफेक प्रकरणानंतर अनेक तासांनी एक निवेदन दिले, कारण जर ते निवेदन दिले नसते, तर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला असता. प्रश्न असा निर्माण होतो की, जर पंजाब सरकार गुन्हा दाखल करू शकते, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील सरकारे काय करत आहेत?

 

कर्नाटकमधील भाजप नेते बूटफेक करणाऱ्या वकिलाचे समर्थन करत होते, त्याची प्रशंसा करत होते, परंतु नंतर त्यांनी मागे फिरत माफी मागितली. तरीही, भाजपकडून या प्रकरणावर ठोस पावले उचललेली नाहीत.याच पार्श्वभूमीवर अजित भारतीने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना उद्देशून म्हटले आहे की, “या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये तुमची भूमिका होती. आता तुम्ही आमच्यासाठी काय करणार?”

आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या अकरा वर्षांपासून हे ट्रोल्स नरेंद्र मोदी यांच्या नावावर इतरांवर देशद्रोहाचे आरोप करत होते, त्यांच्यावर अत्यंत घृणास्पद भाषेत पोस्ट करत होते. आणि आज जेव्हा त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत, तेव्हा तेच ट्रोल्स पंतप्रधानांकडे मदतीची याचना करत आहेत.पत्रकार कुमकुम बिनवाल यांनी या पार्श्वभूमीवर मत व्यक्त केले आहे की, “पंतप्रधानांना वाटते की हे प्रकरण जास्त पुढे जाऊ नये, म्हणूनच त्यांनी फार प्रतिक्रिया दिली नाही.”

दरम्यान, बेंगळुरु पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १३२ आणि १३३ अंतर्गत आहे. ही तक्रार तिथल्या वकिल संघाने दाखल केली असून, तिचा तपास आता दिल्ली पोलिसांकडे जाईल.तामिळनाडूमध्ये सोशल मीडियावर अशा प्रकारच्या कृत्यांवर पाच जणांना अटक झाली आहे, पण भारताचे सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या समर्थनात लोक उघडपणे पुढे येत आहेत, त्याचे गौरव करत आहेत, हे चिंतेचे कारण आहे.

आज संपूर्ण सोशल मीडिया सिस्टीम, गोदी मीडिया आणि काही राजकीय शक्ती बूटफेक करणाऱ्याला हिरो बनवण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र, बेंगळुरु पोलिसांनी शून्य क्रमांकाची एफआयआर नोंदवून दिल्ली पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे.राकेश तिवारी सध्या विविध गोदी मीडियात मुलाखती देत फिरतो आहे आणि स्वतःची प्रशंसा करत आहे. हे दृश्य पाहता भारताच्या माध्यमांची स्थितीही किती दयनीय झाली आहे, हे स्पष्ट होते.म्हणूनच अनेकदा स आदत हसन मंटो यांच्या विधानाचा उल्लेख केला जातो – “आजची मीडिया विकली गेली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!