नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी करडखेडवाडी शिवारात तुरीच्या शेतात लपवून गांजाची शेती शोधली आणि तेथून 14 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुदेव दिलीपराव पवार यंानी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25 सप्टेंबर रोजी दुपारी त्यांनी आणि पोलीस पथकाने करडखेड वाडी शिवारात बालाजी रुक्माजी कोंकोवार यांच्या शेतात तपासणी केली तेंव्हा तेथे तुरीच्या पिकात लपवून गांजाची शेती उभारलेली होती. पोलीसांनी एकूण 95 झाडे उपटून काढली. त्यांचे एकूण वजन 14 किलो 150 ग्रॅम आहे. बाजारात या अंमली पदार्थ गांजाची किंमत 2 लाख 83 हजार रुपये असेल असे तक्रारीत लिहिले आहे. या प्रसंगी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीप्रमाणे शासकीय पंच, नायब तहसीलदार, फोटोग्राफर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा हे सर्व साहित्य घेवून पोलीस करडखेडवाडी शिवारात पोहचले होते.
ही कार्यवाही देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक मारोती मुंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुदेव पवार, पोलीस उपनिरिक्षक महाजन म्हैसनवाड, पोलीस अंमलदार उत्तम सकनुरे, मोहन कनकवळे, ज्ञानोबा केंद्रे, चंद्रकांत भाग्यवंत, साहेबराव सगरोळीकर, शेख रिहाना, वैजनाथ मोटर्गे, नामदेव मोरे, बळीराम धुळे, नामदेव शिरोळे, ज्ञानेश्र्वर ठाकूर, विष्णु चामलवाड, संतोष बोंकलवार आणि मंजुषा लघुळे यांनी पुर्ण केली.
देगलूर पोलीसांनी 2 लाख 83 हजारांचा गांजा पकडला
