जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा, कंधार तालुक्यातील अनेक भागातील पुर परिस्थितीची केली पाहणी

नांदेड(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला असून या पावसात शेतकर्यांच्या शेतीसह पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असून शेतकर्याला शासन सर्वोतपरी मदत करणार असल्याचे सांगत शेतकर्यांनी घाबरून न जाता धिर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे मत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दि.25 रोज गुरुवारी नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आले असतांना सांगितले.

नांदेड जिल्ह्यासह राज्यात मोठ्याप्रमाणात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यात नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे. गेल्या दोन दिवसापासून संपुर्ण शासन शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहे. याच अनुशंगाने आज दि.25 रोज गुरूवारी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी हदगाव तालुक्यातील धानोरा येथून पाहणी दौर्याला सुरूवात केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशीही संवाद साधून त्यांनी शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभ आहे असे आश्र्वासीत केल. जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा, कंधार या तालुक्यातील अनेक पुरग्रस्त गावांना भेटी देवून शेतकर्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आ.बाबुराव कदम कोहळीकर, आ.बालाजी कल्याणकर, आ.आनंद बोंढारकर, माजी खा. सुभाष वानखेडे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.

