नांदेड(प्रतिनिधी)-48 लाख रुपये घेतल्यानंतर 1 कोटी 50 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा एका महिलेविरुध्द परक्राम्य संकीर्ण अभिलेखाचा खटला दाखल करण्यात आला आहे. आता नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात असे करणाऱ्यांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतीलाल मोतीलाल जैन यांनी दिलेल्या तक्र्रारीनुसार सन 2015 मध्ये त्यांनी प्रेमचंद झुंबरलाल भरुट, अनिल झुंबरलाल भरुट, नरेश झुंबरलाल भरुट आणि श्रेणीक अनिल भरुट सर्व रा.वर्धमाननगर नागपूर यांच्याकडून आपल्या घराच्या रजिस्ट्रीसाठी 48 लाख रुपये 1.25 टक्के व्याजदराने घेतले. पुढे त्यांच्याकडून 2.5 ते 3 टक्के दराने दरमहा चक्री व्याज लावून 1 कोटी 50 लाख रुपये अप्रामाणिकपणे घेतले. रजिस्ट्रीच्यावेळी 24 लाख 70 हजार रुपये देतो म्हणून शांतीलाल जैन यांच्याकडून चेक घेतला. त्यांना पैसे दिले नाही. म्हणून बॅंकेत भरता आले नाही आणि तो चेक बाऊन्स झाला. त्यावरुन शांतीलाल जैन यांच्या पत्नीविरुध्द नागपूर न्यायालयात खोटी कार्यवाही करून आर्थिक फसवणुक केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 467, 468, 506, 120 प्रमाणे गुन्हा क्रमांक 343/2025 दाखल केला आहे. हा गुन्हा तपासासाठी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचे पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांंना देण्यात आला आहे. नागोराव कुंडगिर हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.
नांदेड शहरात आर्थिक बाबींचा मोठा घोटाळा घडला; तपास नामवंत पोलीस उपनिरिक्षक कुंडगिर यांच्याकडे
