नांदेड(प्रतिनिधी)-येथील श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ दि.22 ऑगस्ट पासून विमान सेवा बंद करण्यात आली होती. मात्र ही विमानसेवा किती दिवसासाठी करण्यात आली याचे त्यावेळी न सांगितल्यामुळे अनेकांनी अनिश्चित काळासाठी विमानसेवा बंद करण्यात आल्याने नांदेडकरात नाराजी पसरली होती. मात्र अवघ्या 19 दिवसांच्या कालावधीत विमानतळाच्या धावपट्टीची दुरूस्ती करून नागरीकांच्या सेवेसाठी आजपासून विमानसेवा सुरू करण्यात येत असल्यपाची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर देशातील सर्व विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यात नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे पडल्याची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ ही विमानसेवा बंद करण्यात यावी अशा सुचना दिल्या आणि 22 ऑगस्टपासून नांदेडहून होणारी विमानसेवा बंद करण्यात आली. धावपट्टी दुरूस्तीनंतर व कोणताही गाजावाजा न करता पुन्हा नागरीकांच्या सेवेत म्हणजे दि.10 रोज बुधवारपासून नियमित नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावरून नांदेड-बैंगलूरु, अहमदाबाद, पुणे, हैद्राबाद, गाझियाबाद यासह अन्य मार्गांवर विमानसेवा सुरू राहणार असल्याची माहिती विमानतळ संचालक यांनी दिली. नांदेड येथून विमानतळ सेवा सुरू होत असल्याची माहिती प्राप्त होताच अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमानमंत्री राममोहन नायडू, विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहर यांचे आभार खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे यांच्यावतीने करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 732 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महापालिकेसमोर शुक्रवारी ठाकरे पक्षाचे बोंब मारो आंदोल-मारावारा 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन