नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ६४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार प्रभारी अधिकारी ओमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने आसर्जन-तेमाकोंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान काही आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, अवैध उत्खननासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री व साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मोठ्या व लहान लोखंडी बोटी, इंजिने, तराफे, अंदाजे १६० ब्रास रेती, लोखंडी पाईप, टोपले, खोरे, ड्रम तसेच इतर साहित्याचा समावेश आहे. या कारवाईत शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या अवैध रेती उत्खननाला मोठा आळा बसल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध रेती उत्खनन, वाहतूक किंवा साठ्याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. संबंधित व्हिडिओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-31-at-15.46.31.mp4 Kanthak Suryatal Post Views: 925 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गांधींना शिव्या देणारे इन्फ्लुएन्सर पीएमओच्या पाहुणचारात; लोकशाहीच्या मंदिरातील वास्तव! 356 बीएनएसएस अंतर्गत फरार आरोपीची माहिती प्रसिद्ध; न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन