नांदेड जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी सेवानिवृत्त नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस दलात कर्तव्य बजावताना अनेक वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना बाजूला ठेवावे लागले. कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, याची खंतही अनेकांच्या मनात असेल. मात्र आता निवृत्तीनंतरचा प्रत्येक क्षण आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने व्यतीत करा, असा भावनिक सल्ला पोलीस अधीक्षक डॉनीलाभ रोहन यांनी दिला. १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलताना त्यांनी, मी या पदावर असेपर्यंत तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी माझे दार कायम खुले आहे. कोणत्याही संकोचाशिवाय माझ्याकडे या,असे सांगत सर्वांना निरोपासोबतच आपुलकीचा आणि विश्वासाचा दिलासाही दिला. नांदेड जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी व पोलीस अंमलदार नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस उप अधीक्षक (गृह) सुनील माने यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षकांनी सेवानिवृत्तांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत कुटुंबाला वेळ द्यावा, आरोग्याची काळजी घ्यावी व आनंदी जीवन जगावे, असा संदेश दिला. समारंभास पोलीस कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण विभागाने केले. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : 1. पोलीस उपनिरीक्षक विलास मारोती मुस्तापुरे (नियंत्रण कक्ष, नांदेड) 2. पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर दिंगबरराव निकम (पोस्टे कुंटूर) 3. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक खयूम शमशोद्दीन शेख (एटीबी) 4. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संभाजी दत्तात्रय कदम (पोस्टे कुंटूर) 5. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मोहन अमरसिंग राठोड (पोस्टे भोकर) 6. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळाजी माधवराव पंदलवाड (पो.मु. नांदेड) 7. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमर दशरथ परदेशी 8. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नागोराव उदयसिंग चव्हाण (पो.मु. नांदेड) 9. ग्रेड पोलीस अंमलदार उत्तम गोपाळ गायकवाड 10. ग्रेड पोलीस अंमलदार प्रकाश लिंबाजीराव राठोड 11. ग्रेड पोलीस अंमलदार विद्यासागर प्रल्हाद जोंधळे (पोस्टे बिलोली) 12. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उद्धव कोंडीबा भारती (पोस्टे नांदेड ग्रामीण) 13. पोलीस हेड कॉन्स्टेबल भिमराव उमळा जाधव (पोस्टे भोकर) 14. पोलीस कॉन्स्टेबल खुशाल परमेश्वर तुपदळे (एमटी, नांदेड) 15. पोलीस नाईक बाबुराव गणपत मोरे (पो.मु. नांदेड) 16. पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ रघुनाथ शिरसाठ (पोस्टे माळाकोळी). या समारंभात सर्व सेवानिवृत्त अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार,पोलीस उप निरीक्षक शेख रियाज,आशिष बोराटे, पोलीस अंमलदार मारोती कांबळे,नरेंद्र राठोड,सविता भीमलवाड यांच्या सह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितीतां पैकी अनेकांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पोलीस सेवेत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात केला. तसेच उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. Kanthak Suryatal Post Views: 1,109 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 356 बीएनएसएस अंतर्गत फरार आरोपीची माहिती प्रसिद्ध; न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन स्वारातीम विद्यापीठ ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’मध्ये देशात १२ व्या क्रमांकावर