नांदेड (प्रतिनिधी) – मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार वजीराबाद पोलीस ठाण्यातील एका प्रकरणातील फरार आरोपीविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम 356 अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित आरोपी न्यायालयीन सुनावणीस अनुपस्थित असून अद्याप फरार असल्याने त्याची माहिती वर्तमानपत्रांद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील नियमित फौजदारी खटला क्रमांक 988/2002 मधील आरोपी सज्जाद हुसेन पिता जाफर हुसेन, रा. सिटीजन हॉटेलच्या मागे, रेल्वे स्टेशन रोड, नांदेड हा फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपी अथवा त्याच्या नातेवाईकांना ही माहिती मिळून आरोपीने न्यायालयासमोर हजर राहावे, या उद्देशाने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे Kanthak Suryatal Post Views: 959 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध रेती उत्खननावर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा वर्दीतील समर्पणाला सलाम! निवृत्तीनंतर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण जगा – डॉ. नीलाभ रोहन