नांदेड- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
“ज्या समाजाला इतिहास नाही, त्याला वर्तमानही नसतो,” असं ठामपणे सांगणारे, लेखणीतून क्रांती निर्माण करणारे आणि वंचितांच्या दुःखांना आवाज देणारे अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते — ते एक संपूर्ण चळवळ होते. त्यांचे साहित्य हे केवळ कल्पनाशक्तीचे नव्हे, तर वास्तवाचे प्रखर दर्शन घडवणारे होते. अशा ह्या परिवर्तनवादी विचारवंत , संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील लढवय्ये नेते , कामगार चळवळीचे नेते , क्रांतिकारी लेखक साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी साठ वाजता आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊंच्या पुतळा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर , जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर , जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे , गणेश तादलापूरकर , नेताजी भोसले , महादेव मठपती , लक्ष्मी वाघमारे , ललिता शिंदे, शितल वैद्य , लीना गायकवाड आदींची उपस्थिती होती.
