2023 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील एक आरोपी स्थागुशाने पकडला; जवळपास 5 लाखांचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2023 मध्ये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी पुर्ण करून त्या प्रकरणातील चोरट्याला पकडून आणले आहे.त्याच्याकडून 4 लाख 89 हजार 502 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2023 मध्ये प्रशांत प्रभाकरराव डहाळे हे सिडकोमध्ये असलेली आपली सोन्या-चांदीची दुकान उघडत असतांना त्यांच्या मोटारसायकलवर डिक्कीत ठेवलेले सोन्याचे दागिणे चोरून दुसऱ्या दुचाकीवर बसून पळून गेले होते. या प्रकरणी यापुर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून 8 लाख 18 हजार 419 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी 23 जुलै रोजी निझामाबाद रेल्वे स्थानकाच्या बाहेर सापळा लावून दुसऱ्या आरोपीला पकडले. त्याचे नाव देबा उर्फ मखान मारीया प्रधान (20) रा.दासमनीया जि.जाजपूर राज्य ओडीसा असे आहे. या चोरट्याकडून 4 लाख 89 हजार 502 रुपयांचा 2023 मधील चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!