लाल बावट्याच्या आंदोलनाची यशस्वी सांगता नांदेड(प्रतिनिधी) -महापालिका प्रशासनाच्यावतीने बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुर्ववत कामावर घेण्यासह थकीत बोनस व इतर प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठवाडा न.पा., मनपा कामगार कर्मचारी युनियन लाल बावटाच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या तीव्र आंदोलनाची आज यशस्वी समारोप करण्यात आला. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांपूर्वी काही कंत्राटी कामगारांना बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केले होते. त्याचप्रमाणे बोनस वाटपात भेदभाव केल्याने संघटनेच्यावतीने महापालिकेसमोर सातत्याने आंदोलन, पत्रव्यवहार करण्यात येत होता. याच प्रश्नांवर 3 फेब्रुवारी पासून महापालिकेसमोर बेमुद्दत आंदोलन सुरु करण्यात आले होते. अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांच्या उपस्थितीत विविध विभागाचे प्रमुख तसेच कामगार व कामगार संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत सर्व मागण्यांची पुर्तता करुन त्यावर येत्या दोन दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर संघटनेच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त नितीन गाढवे, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्यासह कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शांताबाई पवळे, कॉ.वंदना वाघमारे, कॉ.वैशाली धुळे, कॉ.शशिकला वाघमारे यांच्यासह इतर कामगार प्रतिनिधी सहभागी झाले होते. यशस्वी चर्चेनंतर कॉ.प्रदीप नागापूरकर व प्रशासनाच्यावतीने वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक वसीम तडवी यांच्या हस्ते उपोषणार्थींना ज्युस पाजवून आंदोलन स्थगित करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 696 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई, गोदी मीडिया सारख्या प्रसिद्धीमुळे झालेल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील