नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस पथकाने नृसिंह चौक जुना कौठा येथे एका औषधी विक्रेत्या दुकानाची तपासणी केली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्या ठिकाणी बऱ्याच प्रतिबंधीत गोळ्या सुध्दा कोणत्याही डॉक्टरची चिठ्ठी नसतांना सहज देण्यात येत होत्या.
अन्न व औषधी प्रशासन नांदेड येथील सहाय्यक आयुक्त ए.टी. राठोड, पोलीस उपनिरिक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, रुपेश दासरवाड, जसपालसिंघ कालो यांनी 21 जुलै रोजी Prega या औषधाची मागणी केली. त्यावेळी डॉक्टरची चिठ्ठी दाखवली नाही. पण त्यांनी ते औषध दिले. या औषधावर विहित विक्री किंमत 825 रुपये असतांना 600 रुपये घेतले. त्यानंतर आम्ही आमचे ओखपत्र दाखवून त्याची विचारणा केली. त्याचे नाव विजय चंद्रया बंदमवार असे होते. या दुकानाचे नाव शंभु मेडिकल कॉर्नर असे आहे. या प्रतिष्ठाणाच्या मालकी सौ. रेखा बंदमवार पण आल्या. या दुकानासाठी नोंदणीकृत औषध तज्ञ सुनिता ज्ञानदेव चव्हाण या मात्र हजर नव्हत्या. जे दुकानासाठी लागणारे परवाने दर्शनी भागात नव्हते. तपासणी पुस्तक या लोकांनी दिले नाही. दि.16 मार्च 2025 ते 21 जुलै 2025 या कालखंडात एकही विक्री बिल आढळले नाही. खरेदी बिल अनुक्रमांप्रमाणे साठवलेले दिसत नाही.Pregabalin युक्त औषधी साठा या दुकानात सापडलेला नाही.
या प्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने या दुकानावर आर्थिक दंड ठोठावला जाईल आणि त्यांच्या औषधी दुकानाचा परवाना सुध्दा रद्द केला जाईल अशी माहिती सांगण्यातत आली. या कार्यवाहीचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले.
डॉक्टरची चिठ्ठी नसतांना शंभु मेडिकलने औषधे दिली
