नांदेड,(प्रतिनिधी)- 44 वर्षीय व्यक्तीला अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी ३ जुलै च्या रात्री ८.३० ते ४ जुलैच्या सकाळी १०.३० वाजेदरम्यान गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. मात्र हदगाव पोलिसांनी अत्यंत जलद गतीने आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने आठ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
शितल कैलास काटेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती कैलास विश्वनाथ काटेकर (44) हे ३ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता पासून ते 4 जुलै च्या सकाळी १०. ३० वाजेदरम्यान मोजे डोरली शिवारात पत्राच्या शेडमध्ये असताना कोणीतरी अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी त्यांचा गंभीर जखमी करून त्यांचा खून केला आहे. कैलास विश्वनाथ काटेकर शेतातील जागलीसाठी त्या टिन पत्राच्या शेडमध्ये झोपले होते. हदगाव पोलिसांनी या तक्रारीवरून हदगाव 216/ 2025 दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे करीत आहेत.
संकेत दिघे यांनी आपली तपास सगळे फिरवून आपल्या सहकारी पोलिसांच्या मदतीने अत्यंत जलद गतीने मारेकर्याला पकडले .मारेकऱ्याचे नाव नारायण गंगाधर टोकलवाड (28) राहणार डोरली असे आहे. दारू पिण्याच्या वादातून मी कैलास चा खून केल्याची कबुली नारायण टोकलवाड ने दिली आहे. आज न्यायालयाने मारेकरी नारायण टोकलवाडला 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.