नांदेड(प्रतिनिधी)- मांडवी पोलीसांनी 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 4 टन मांगूर मासे पकडले आहेत. या संदर्भाने सहाय्यक मत्स व्यवसाय विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरुन उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकमधील 1 अशा तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक मत्स व्यवसाय विकास अधिकारी काशिनाथ श्रीकांत बडीहवेली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात मांडवीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गंगाधर गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक मेश्राम, पोलीस अंमलदार मालाबाई कनाके, गुव्हाळे हे त्यांना मिळालेल्या माहितीनुसार उन्केश्र्वर नाका येथील पॉईंटवर नाका बंदी करत होते. त्यावेळी एक चार चाकी गाडी क्रमांक के.ए.50-बी. 2141 आली. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 4 टन मांगूर मासे भरलेले होते. 80 रुपये प्रतिकिलो प्रमाणे या चार टन मास्यांची किंमत 3 लाख 20 हजार रुपये होते. तसेच 15 लाख रुपयांची गाडी असा एकूण 18 लाख 20 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केलेला आहे. या प्रकरणी राजकुमार राजेंद्रप्रसाद द्विवेदी (53) गाडी चालक रा. फत्तेपुर मुसानगर उत्तरप्रदेश, संतोश दयाराम यादव(40) रा.संदीप पारासन उत्तरप्रदेश आणि अफजल पाशा ताज पाशा (34) रा.टिपुनगर कर्नाटक या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 56/2025 दाखल केला आहे. किनवट उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक रामकृष्ण मळघने यांनी मांडवी पोलीसांचे कौतुक केले आहे.
मांडवी पोलीसांनी 4 टन मांगुर मासे पकडले
