नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी बेकायेदशीर वाहतुक होणारा गुटखा पकडला आहे. या प्रकरणात 3 लाख 20 हजार 400 रुपयांचा गुटखा आणि 6 लाख रुपयांची गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार राजवंतसिंघ बुंगई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार कृष्णा तलवारे, वैजनाथ मोटारगे, साहेबराव सगरोळीकर, रणजित मुजिदार हे दि.30 जून रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास गस्त करत असतांना चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.12 के.एन.6039 ची तपासणी केली. त्यामध्ये शेख साजिद शेख जलाल बागवान (38) रा.हिंगोली आणि शेख अख्तर शेख गफार बागवान (33) रा.हिंगोली असे दोन जण बसलेले होते. गाडीची तपासणी केली तेंव्हा शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत विमल पान मसाला, रजनिगंधा पान मसाला, सिग्नेचर फाईनेस्ट पान मसाला, व्ही-1 बीग सुगंधीत टोबॅको असे अनेक प्रकार सापडले. त्या सर्वांची किंंमत 3 लाख 20 हजार 400 रुपये आहे. सोबतच चार चाकी गाडी 6 लाख रुपयांची असा 9 लाख 20 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देगलूरचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनी देगलूर पोलीसांचे कौतुक केले आहे.
देगलूर पोलीसांनी 3 लाख 20 हजारांचा गुटखा पकडला
