एक एपीआय, पाच पीएसआय, सात श्रेणी पीएसआय, कार्यालय अधिक्षक, वरिष्ठ श्रेणी लिपीक, दहा पोलीस अंमलदारांचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, एक कार्यालय अधीक्षक, एक वरिष्ठ श्रेणी लिपीक, पाच पोलीस उपनिरिक्षक, सात श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दहा पोलीस अंमलदार अशा एकूण 30 जणांना सेवानिवृत्तीच्या दिवशी त्या सर्वांचा सहकुटूंब सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला.
नांदेड जिल्हा पोलीस दलातून नियंत्रण कक्ष येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक रमाकांत हनमंतराव नागरगोजे, पोलीस उपनिरिक्षक बाबु रघुनाथ हिंगमिरे-पोलीस नियंत्रण कक्ष, जम्मू खॉ अंबीया खॉ पठाण-मांडवी, शेषराव विठ्ठलराव ऐनगंठे, प्रकाश गणपतराव आवडे, किशन रामा आडे-पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय येथील कार्यालय अधिक्षक सुधाकर कोंडीबा घोडजकर, वरिष्ठ श्रेणी लिपीक राजू धनवू शाहू, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक गोविंद संभाजी मुंडे-स्थागुशा, सदाशिव यशवंतराव उबाळे, बालाजी शिवदास काळेवाड-पोलीस मुख्यालय, शेख शादुल शेख लाल आणि मधुकर व्यंकटराव शिंदे-नांदेड ग्रामीण, मोहम्मद लतिफोद्दीन मोहियोद्दीन-मोटार परिवहन विभाग, मोईनोद्दीन निजामोद्दीन शेख-एटीबी, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक खामराव शामराव वानखेडे, वैजनाथ दादाराव काळे, संजय विश्र्वनाथ वाठोरे, संभा बळीराम कदम-पोलीस मुख्यालय, सुधाकर लक्ष्मणराव कदम-हिमायतनगर, पोलीस अंमलदार बिरेंद्रसिंघ आशासिंघ बुंगई-एटीबी, पुंडलिक पुंजाजी बोंडलेवाड-भोकर, बापुराव मेघाजी आडे, विष्णु शंकर डहाळे-पोलीस मुख्यालय, बालाजी लक्ष्मणराव चिटलवार-माळाकोळी, प्रल्हाद मनु आडे-किनवट, रुपसिंग पांडू जाधव-इस्लापूर, बळीराम मालु धुमाळे-शहर वाहतुक शाखा, भुजंग नारायण खेडकर-कंधार, तानाजी व्यंकटराव मुळके-लोहा असे 30 जण सेवानिवृत्त झाले आहेत.
आज सर्व सेवानिवृत्तांना त्यांच्या कुटूंबासह सन्मान करून पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार, जनसंपर्क अधिकारी ज.ए.गायकवाड यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचे सर्व नातलग, अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार रुख्मीनी कानगुले यांनी केले. श्रेणी पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार मारोती कांबळे आणि सविता भिमलवाड यांनी या काार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.
नांदेड जिल्हा पोलीस दलातून आज 30 जण सेवानिवृत्त
