नांदेड : येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी तथा नांदेड एसटी महामंडळ विभागात सहाय्यक कारागीर (विजतंत्री) म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ दामोधर जोंधळे वय 44 वर्ष यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थ जोंधळे हे विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक भान असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी विविध विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला होता. विद्यार्थ्यांसाठी झटणारा युवक अशी त्यांची त्याकाळी विशेष ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच दोन भाऊ व बहिणी असा परिवार आहे. प्रा. राजू सोनसळे व नगरसेवक राहुल सोनसळे यांचे ते मेहुणे होते. त्यांचा अंत्यसंस्कार उद्या दि. २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता गोवर्धन घाट, नांदेड येथे होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,288 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation युद्ध जगात… पण खताचा संघर्ष शेतकऱ्याच्या अंगणात!नांदेडचे युरिया दुसऱ्या जिल्ह्यात पाठवले जात आहे पत्रकाराला धमकी व मारहाणीचा प्रयत्न; अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल