नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून तीन चोऱ्यांमध्ये चोरीला गेेलेल्या ऐवजापैकी 56 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार केंद्रे, पचलिंग, पवार, कल्याणकर, माने, आवळे आदींनी अब्दुल आफताब अब्दुल अजीज (22) याला अटक केली याने सांगितले की, मोहम्मद आमेर उर्फ पप्पु याच्यासोबत त्याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. त्यानंतर कौशल्यपुर्ण तपास करत या पथकाने तीन चोऱ्यांमधील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 56 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोऱ्या उघडकीस आणल्या
