नांदेड(प्रतिनिधी)-नमस्कार चौक भागात एक वेल्डींग दुकान फोडून चोरट्यांनी 84 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच माहूरमध्ये 1 लाख रुपये दुचाकीच्या पेट्रोल टॅंक वरून चोरण्यात आले आहेत.
शेख शफी शेख पाशा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नमस्कारचौक नांदेड येथे त्यांचे वेल्डींगचे दुकान आहे. 23 जून रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील लोखंडी पत्र्याचा दरवाजा कट करून कोणी तरी दुकानात प्रवेश केला आणि त्यांच्या दुकानातील विद्युत साहित्य 59 हजार रुपयांचे चोरले आहे. तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या दुकानाचे शटर तोडून त्या दुकानातील इर्न्व्हटर व बॅटऱ्या 25 हजार रुपये किंमतीच्या असा एकूण 84 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 246/2025 प्रमाणे नोंदवली असून पोलीस उपनिरिक्षक कल्याणकर अधिक तपास करीत आहेत.
टाकळी ता.माहूर येथील भागवत निवृत्ती जायभाये यांनी 20 जून रोजी दुपारी एसबीआय शाखा माहूर येथून 1 लाख रुपये काढले आणि आपल्या दुचाकीच्या टॅंकवरील पाकिटात ठेवले. परंतू ही रक्कम चोरीला गेली. माहूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 102/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
नमस्कार चौकात दोन दुकान फोडले ; माहूरमध्ये 1 लाख चोरीला गेले
