काही काळापूर्वी एक सुशिक्षित आणि उच्च पदावरील शीख बंधू यांनी मला विचारलं,
“आज जर गुरु गोबिंद सिंघ जी असते, तर त्यांनी कृपाण ऐवजी रिव्हॉल्वर दिली असती का?” माझे विचारचक्र सुरू झाले. माझ्या मनात आले गुरु गोबिंद सिंघ जी महाराज च्या काळातही बंदुक, तोफ, रिव्हाल्वर असे आधुनिक शस्त्रास्त्रे होती. मी या मुळे त्या ठिकाणी मौन धारण केले कारण वादविवादात तुन काही साध्य होत नाही.
या मुळेच त्या क्षणी मी शांत राहिलो. कारण मला वाटलं, काही गोष्टी फक्त तर्काने नाही, तर अंतर आत्म्याच्या संवादाने समजतात.त्यानंतर मी अनेक ज्ञानी, धर्मज्ञ व्यक्तींशी चर्चा केली, मन:पूर्वक चिंतन केलं आणि आज जे निष्कर्ष मला मिळाले, ते मी आपल्यासमोर सादर करतो.
कृपाण – युद्धाचं शस्त्र नाही, तर जीवनशैलीचं मार्गदर्शन आहे.
फक्त आत्मसंरक्षण नव्हे, तर धर्मसंरक्षणाचं प्रतीक कृपाण ही फक्त लढाईसाठी वापरण्याची वस्तू नाही, ती आत्म सुरक्षा,धर्म, न्याय, दया यांचे प्रतीक आहे. शक्तीबरोबरच ती मर्यादा आणि विवेकाच दर्शन घडवते.हिंसेचं नव्हे, तर शौर्याच प्रतिक आहे.
रिव्हॉल्वर हे दूरून, कधी लपून वार करण्याचं अस्त्र आहे.पण कृपाण समोरून, धाडसाने अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं बळ देते.
आत्म नियंत्रण आणि मर्यादेच प्रतीक कृपाण धारण करणारा शीख ईश्वराची आज्ञा, सेवा आणि जबाबदारी यांना मानतो.रिव्हॉल्वर अहंकार वाढवू शकते, पण कृपाण कर्तव्याची जाणीव आणि संयम देते.
*सेवा आणि शौर्य यांचं संतुलन:
गुरुजींनी “संत-सिपाही” तयार केला.कृपाण हे त्या संतुलनाचं प्रतीक आहे, जिथे एका हातात सेवा, दुसऱ्या हातात शौर्य.
आध्यात्मिक परंपरेचा कणा
पाच ककार – केस, कडा, कच्छा, कंघा आणि कृपाण हे फक्त शरीर धारण नसून आंतरिक शिस्तीचा मार्ग आहेत.कृपाण हे त्या मार्गाचं शक्तिशाली अंग आहे.
शस्त्र आणि अस्त्र यामधील फरक
शस्त्र जे थेट शरीराने चालवले जाते कृपाण, भाला, तलवार, लाठी,साहस, सन्मान, शौर्य आणि थेट लढाईचं प्रतीक आहे.
अस्त्र जे दूरून यंत्र किंवा स्फोटकांच्या साहाय्याने चालवले जाते. रिव्हॉल्वर, बंदूक, तोफ दहशत, लपून वार आणि मृत्यूचं प्रतीक आहे.
गुरुजींनी कृपाण दिली कारण ती ‘शस्त्र’ आहे. सन्मानानं वापरली जाते.
रिव्हॉल्वर ‘अस्त्र’ आहे. जे लपून, घातकी वापरली जाते
तलवारबाजी, कृपाण फिरवण्याचा नियमित सराव केल्याने शरीर सक्रिय, स्फुर्तीदार होते आणि रक्तप्रवाह सुधारतो.ही एक व्यायाम प्रणाली आहे. शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवणारी.
गुरुजींनी हलाल मांसावर बंदी घालून झटका प्रणाली चालू केली.त्यामध्ये कृपाण वापरली जाते दया, वेग आणि किमान पीडेसह वध करण्यासाठी.
कृपाण कोणत्याही वर्गाचा शीख गरीब असो वा श्रीमंत सहज विकत घेऊन धारण करू शकतो.
ना परवाना, ना बारूद, ना कोणतेही परवाने.आर्थिक दृष्टीने स्वस्त सहजपणे प्राप्त होते.
गुरु गोबिंद सिंघ जी यांचा स्पष्ट संदेश
मी खालसा तयार केला आहे, जो न्याय, सेवा आणि करुणेच्या मार्गावर चालेल.
कृपाण त्याचा रक्षक आहे. न कोणाची भिती, न कोणाला भय.
गुरु गोबिंद सिंघ जी यांनी कृपाण दिली कारण ती धर्म, सेवा, संयम, धैर्य आणि आत्मशिस्तीच प्रतीक आहे.
रिव्हॉल्वर शरीराचं रक्षण करेल,पण कृपाण धर्म आणि आत्म्याचं संरक्षण करते.
या विषयात कुठे त्रुटी झाली असेल, तर सर्व ज्ञानी, सर्व लोकांना आणि धर्मप्रेमी बांधवांची क्षमा मागतो.
प्रस्तुतकर्ता: –राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रेनर, अबचलनगर, नांदेड 7700063999