नांदेड(प्रतिनिधी)- सांगवी (बु) येथे एका 19 वर्षीय बालकाने त्याला कामावर न नेणे आणि त्याचा मोबाईल घेवून टाकणे या दोन कारणांमुळे आत्महत्या केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जनाबाई पुंडलिक विठ्ठलराव इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जूनच्या मध्यरात्री 1 ते 3 वाजेदरम्यान गोकुळनगर सांगवी येथे त्यांच्या घरात त्यांचा मुलगा रविराज पुंडलिक इंगळे याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. जनबाई इंगळेच्या सांगण्याप्रमाणे मंगेश मग्गीरवार यांच्याकडे रविराज इंगळे हा कामाला होता. त्याचा मोबाईल काढून घेत त्याला उद्या पासून कामाला येवू नका असे मग्गीरवारने सांगितले. याचा परिणाम त्याचा मनावर झाला आणि त्याने आत्महत्या केली आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 244/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.
मालकाच्या रागावण्याने युवक कामगाराने केली आत्महत्या
