नांदेड(प्रतिनिधी)-किनवट गावात एक घरफोडून चोरट्यांनी 86 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवरोड चंद्रपुरची देवी मंदिराजवळ एका महिलेचे 60 हजार रुपये किंमतीचे गंठण दरोडेखोरांनी तोडून नेले आहे. किनवट येथील फकीरराव हुसेनराव जुनगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून रोजी दुपारी 3 वाजता ते आपल्या किनवट येथील घराला कुलूप लावून मार्केटमध्ये गेलीे असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे घरफोडून घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले रोख 46 हजार रुपये आणि 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे असा एकूण 86 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 203/2025 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस अंमलदार वाडगुरे अधिक तपास करीत आहेत. पाटबंधारे नगरमध्ये राहणाऱ्या महिला शांता सुधाकर सोनसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जून रोजी सकाळी 6 वाजता त्या मॉर्निंग वॉक करत असतांना शिवरोड, चंद्रपुरची देवी मंदिराजवळ दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे शॉर्ट गंठण 60 हजार रुपये किंमतीचे तोडून पळून गेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 358/2025 प्रमाणे दाखल केली असून तपास पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,370 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड रूहानी हवाओं में बसी एक जमीनी जन्नत मालकाच्या रागावण्याने युवक कामगाराने केली आत्महत्या