नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी 24 तासात दोन अल्पवयीन बालिकांचा शोध घेवून त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 20 जून रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या दोन अल्पवयीन बालिका 20 जून रोजी घरातून रागात निघून गेल्या आहेत. त्यांनी नातेवाईक आणि इतरांकडे शोध घेतला. परंतू मिळाल्या नाही म्हणून त्यांनी 21 जून रोजी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 238/2025 दाखल करण्यात आला.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक हेमंत देशपांडे, पोलीस अंमलदार भांगे आदींनी या दोन अल्पवयीन बालिकांना पंढरपुर येथून नांदेडला आणले आणि सुखरुप त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले.
विमानतळ पोलीसांनी पंढरपूरमधून शोधून आणल्या दोन अल्पवयीन बालिका
