नांदेड(प्रतिनिधी)- पोलीसांना पोलीस महासंचालकांकडून गृहकर्ज मिळत असते. त्यासाठी अत्यंत जलदगतीने कर्ज मिळेल अशी सोय करतो म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील एक कनिष्ठ लिपीक आणि त्याचा भावजी(खाजगी इसम) या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 3 हजार रुपयांची लाच फोन पे वर स्विकारल्यानंतर गजाआड केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल असा आहे की, त्यांच्याकडे आलेल्या अर्जानुसार त्यांना पोलीस महासंचालक देतात ते गृहकर्ज हवे हेाते. त्यासाठी त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अर्ज केला होता. पोलीस महासंचालकांचे गृहकर्ज पोलीसंाशिवाय इतरांना कोणाला मिळत नाही. म्हणजे हा तक्रारदार पोलीसच आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक सुभाष रामदास नवलू (47) यांनी पोलीस महासंचालकांचे गृह बांधणी कर्ज मंजुर हवे असेल तर आणि ते लवकर मिळावे असे वाटत असेल तर तक्रारदार पोलीसाकडून 3 हजार रुपये लाच मागितली.
या लाच मागणीची पडताळणी 5 मे 2025 रोजी झाली. त्यावेळी सुभाष नवलू यांनी फोन पे वर पैसे पाठविण्यास सांगितले. तेंव्हा तक्रारदार पोलीसाने सांगितले की, फोन पे वर पैसे कमी आहेत. तेंव्हा सुभाष नवलूने पगार झाल्यावर ये असे उत्तर दिले. दि.20 जून रोजी तक्रारदार पोलीसाला कनिष्ठ लिपीक नवलूने फोन केला आणि सांगितले की, पोलीस महासंचालकांच्या घरबांधणी कर्जाबाबत पोलीस अधिक्षक कार्यालयात येण्यास सांगितले. तेंव्हा नवलूने तक्रारदार पोलीसाला तुझा मुळ पगार किती आहे, तुझे पोलीस महासंचालक कार्यालयातील ऑनलाईन अर्ज भरले आहे काय? असे विचारले. तसेच बजेट येईल तेंव्हा तुझे काम करून देतो असे सांगून खाजगी इसम कमलेश गोकुळ इंदुरकर (47) रा.छत्रपती संभाजीनगर यांचा फोन पे क्रमांक दिला आणि त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार 23 जून रोजी तक्रारदार पोलीसाने नवलू यांच्या सांगण्याप्रमाणे कमलेश इंदुरकर यांच्या फोन पेवर 3 हजार रुपये पाठविले आणि हे पैसे पाठविताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुभाष रामदास नवलू आणि कमेलश गोकुळ इंदुरकर यांना ताब्यात घेतले. सुभाष नवलू यांचे भावजी आहेत कमलेश इंदुरकर यासंदर्भाने पोलीस ठाणे सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक मुकूंद आघाव, पोलीस उपअधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस अंमलदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, राजेंद्र नंदीले यांनी पुर्ण केली.
पोलीसाकडून पोलीस महासंचालकांच्या गृह कर्ज मंजुर करून देण्यासाठी 3 हजाराची लाच फोन पे वर स्विकारणाऱ्या लिपीकाला आणि त्याच्या भावजीला अटक
