नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. इयत्ता १२ वी (सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ पर्यंत आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार २३ जानेवारी २०२६ ते सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ हा आहे. इयत्ता १० वी परीक्षा लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ राहील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी सोमवार २ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ फेब्रुवारी २०२६ हा आहे. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मिडीया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 663 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नंबर प्लेट शिवाय वाहन चालवू नका – प्रादेशिक परिवहन अधिकारी;विशेष तपासणी मोहिमेत 22 दोषी वाहनांवर कारवाई माजी सैनिक रामचंद्र जोंधळे यांचे निधन