नांदेड(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी तीन 30 लाखांच्या हायवा गाड्या आणि 63 हजार रुपयांची चोरटी वाळू पकडली आहे. तसेच लिंबगाव पोलीसांनी 6 लाख रुपयांचा एक टिप्पर आणि 12 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू पकडली आहे.
पोलीस उपनिरिक्षक अप्पासाहेब मुरलीधर सानप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 जून रोजी पहाटे 4.45 वाजता लहु गणेश गवते (27), शेख चॉंद शेख कासीम(32) दोघे रा.किरोडा ता.लोहा आणि रामेश्र्वर ज्ञानोबा बुद्रुक (26) रा.पांगरी ता.लोहा, सद्दाम बापूराव गवते रा.पेनुर ता.लोहा या सर्वांनी आपल्या फायद्यासाठी वाळू ही शासकीय मालमत्ता आहे हे माहित असतांना ती बिना परवाना तिन हायवा गाड्यांमध्ये भरून घेवून जात असतांना सापडले. हा प्रकार घोड फाटा ता.कंधार येथे घडला. पोलीसांनी या तिन हायवा गाड्या आणि त्यातील वाळू असा एकूण 30 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल या घटनेत जप्त केला आहे. कंधार पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 192/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.
लिंबगाव येथील पोलीस अंमलदार मधुकर गणेशराव हंबर्डे, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.19 जूनच्या रात्री 9 वाजता नाळेश्र्वर फाटा ते लिंबगाव चौक या दरम्यान ते तपासणी करत असतांना त्यांनी टिप्पर क्रमांक एम.एच.43 वाय 1790 ची तपासणी केली. त्यामध्ये बेकायदेशीर रित्या वाळू भरलेली होती. पोलीसांनी 6 लाखांचा टिप्पर आणि 12 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू असे साहित्य जप्त केले आहे. लिंबगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 100/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार घुन्नर अधिक तपास करीत आहेत.
अवैध रेती वाहतुकीच्या 36 लाखांच्या 4 गाड्या आणि 75 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू जप्त
