नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी दोन जणांना पकडून ते बळजबरीने, निर्दयीपणे आणि कत्तलकरण्यासाठी नेत असलेले पाच गोवंश पकडले आहेत. गोवंश नेणारी गाडी आणि गोवंशांची किंमत असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल माळाकोळी पोलीसांनी जप्त केला आहे.
माळाकोळी येथील पोलीस अंमलदार बजरंग कल्लेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जून रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक, पोलीस उपनिरिक्षक अशोककुमार गुडपे, नारायण गौंड, पोलीस अंमलदार बजरंग कल्लेवार आणि शरदचंद्र चावरे हे बनवस जाणाऱ्या रस्त्यावर गस्त करत असतांना त्यांनी एम.एच.04 वाय.6010 क्रमांकाची चार चाकी गाडी थांबवली. त्यामध्ये पाच गोवंश जनावरे चोरटी विक्री करण्यासाठी, कत्तल करण्यासाठी, अत्यंत क्रुरतेने बांधून घेवून जात होते. या संदर्भाने माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 110/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीच्या सदरात शेख महेबुब शेख सुब्रतो(30) रा.इदगाहनगर गल्ली सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर आणि शेख इप्तेहार शेख सत्तार (45) रा.नागचाप झोपडपट्टी ता.मालेगाव जि.नाशिक या दोघांची नावे आहेत. कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी माळाकोळी पोलीसांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
माळाकोळी पोलीसांनी पाच गोवंश पकडले
