नांदेड(प्रतिनिधी)-सहा पोलीस निरिक्षक, बारा सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आकरा पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केले आहेत. आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार हे आदेश करण्यात आले आहेत. पदस्थापना सध्या तात्पुर्त्या स्वरुपात आहे.
पोलीस अधिक्षकांनी जारी केलेल्या आदेशानुसार नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक सदाशिव नागोराव भडीकर यांना धर्माबाद पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.धर्माबादचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब लक्ष्मण रोकडे यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले आहे. संतोष बापूराव तांबे यांना भाग्यनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे आणि भाग्यनगरचे रामदास बाबुराव शेंडगे यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले आहे. राजेश अशोक पुरी यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठविले आहे आणि शिवाजीनगर येथील शिवाजी दत्तात्रय गुरमे यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील बालाजी रामराव भंडे यांना जिल्हा विशेष शाखेत प्रभारी अधिकारी करण्यात आले आहे.
बदली करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. बस्वराज बाबुराव तमशेट्टे-नियंत्रण कक्ष (मुखेड) , रामचंद्र हरीशचंद्र केदार-लोहा(वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार), अनिल दत्ता काचमांडे-नियंत्रण कक्ष(शिवाजीनगर), अनुपमा दिलीपराव केंद्रे-मुखेड(भाग्यनगर), नियंत्रण कक्षातील नव्याने नियुक्ती मिळालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक नृसिंह राम आनलदास-प्रतिबंधक सेल, बालाजी गोविंदराव महाजन-भाग्यनगर, संदीप बाबुराव थडवे-शिवाजीनगर, लता गणेश पगलवार-धर्माबाद, उमाकांत वैजनाथ पुणे-वजिराबाद, रामकृष्ण श्रीहरी पाटील-कंधार, श्रीधर भागवतराव जगताप-एएचटीयु नांदेड.
बदली करण्यात आलेले पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरिक्षक सुमित गोविंदराव बासंबेकर-संगणक प्रशिक्षण अर्ज शाखा नांदेड,शंकर धनाजीराव मोरे-मुक्रामाबाद, गौतम हनुमंतराव वाहुळे-वाचक इतवारा उपविभाग, हेमंत दत्तोपंत देशपांडे-विमानतळ, शंकर रावसाहेब देशमुख- जिल्हा विशेष शाखा, विजय लिंगूराम पंतोजी-बिलोली, सुनिल लहु जाधव- कुंटूर, अविनाश बाबूराव चव्हाण-वजिराबाद, संदीप व्यंकटराव भोसले-उपविभागीय पोलीस अधिकारी-इतवारा (लोहा), आशिष सिताराम बोराटे-विमानतळ (मनाठा), सय्यद अनीस फातेमा-संगणक शाखा(विमानतळ).
सहा पोलीस निरिक्षक, बारा सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आकरा पोलीस उपनिरिक्षक यांचे खांदेपालट
