नांदेड (प्रतिनिधी)- साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व उल्लेखनीय कार्य कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी नांदेड येथील ऍड. यदुपत श्यामसुंदर अर्धापूरकर यांची डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार-२०२६ साठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ०३:३५ वाजता साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे चौक, नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लहुजी साळवे युवक संघ, नांदेड आणि साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, नांदेड यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे. ऍड. यदुपत श्यामसुंदर अर्धापूरकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात असून, या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 768 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १०० सोनाराची अन् १ लोहाराची! यमनच्या अंसारुल्लाहने सौदीच्या नाकावर मारला जोरदार मुक्का! दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर? मुख्य प्रवाहातील अँकर्सवर विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप; पाहा काय घडलं जंतरमंतरवर