दिव्यांगांच्या निधीसाठी खा.अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन देवून केली मागणी

नांदेड (प्रतिनिधी)-दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत. मागण्यांचे निवेदन खा.अशोक चव्हाण यांना देण्यात आले.
राज्य व केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जातात त्याचबरोबर निधीही दिला जातो खासदारांना व आमदारांना निधी खर्च करण्याचा अधिकार दिला जातो व त्यांच्या खात्यामध्ये निधी दिला जातो परंतु स्थानिक खासदार आमदार हा निधी वर्षानुवर्षं खर्चच करत नसल्यामुळे दिव्यांगांना शासनाच्या योजना मिळत नाहीत. यासाठी वारंवार तक्रार निवेदन देऊनही आंदोलन उपोषण करूनही आमदार खासदारांनी निधी खर्च केला नसल्याने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आमदारांच्या घरावर भीक मागो आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिवाजीनगर येथील ओम हॉटेलपासून भिक मागत-मागत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर धडकला. या मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील.नागनाथ कामजळगे,रवि कोकरे.शिवाजी सुर्यवंशी, किरणकुमार न्यालापल्ली, अनिता लोणे,भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, सविता गवते यांच्यासह हजारो दिव्यांग बांधव भगिनी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!