नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी 8 मार्चच्या पहाटे 4.15 वाजेच्यासुमारास वाघी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे एक टिपर आणि एक हायवा अशा दोन गाड्या वाळूसह पकडल्या आहेत. या प्रकरणातील एकूण जप्त मुद्देमाल 18 लाख 36 हजारांचा आहे.
लिंबगाव पोलीस 8 मार्च रोजी पहाटे गस्त करत असतांना वाघी शिवारातून येणाऱ्या टिपर क्रमांक एमएच 04-6539 ची तपासणी केली. सोबतच हायवाय क्रमांक एम.एच.24 एबी 8127 ची तपासणी केली या दोन्ही गाड्यामध्ये 6 ब्रास वाळू भरलेली होती. वाळू संदर्भाचे कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. दोन्ही गाड्यांमधील 24 हजार रुपयांची वाळू आणि टीपर 3 लाख रुपयांचा आणि हायवा गाडी 15 लाख रुपयांची असा एकूण 18 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपअधिक्षक डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनात लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनकर, पोलीस अंमलदार पवार, धुन्नर, दत्ता शिंदे यांनी या गाड्या पकडल्या आहेत.
लिंबगाव पोलीसांनी बेकायदा वाळूची एक हायवा आणि एक टिपर अशा दोन गाड्या पकडल्या
