एकाच नावाचे तीन युनिक आयडी क्रमांक; पश्चिम बंगालमध्ये मतदार गोंधळ

महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरीयाणातील 35 लाख मतदार महाराष्ट्रात आले. पुढे हे मतदार दिल्लीत जातील. त्यानंतर बिहार आणि पुढे पश्चिम बंगालमध्ये जातील असे सांगितले होते. पण या संदर्भाचा पुरावा काही नव्हता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा पुरावा शोधला. ईपीक(इलेक्ट्रो फोटो आयडेंटी कार्ड) क्रमांक एकच आणि पहिल्यांदा तो ईपीक कार्ड हिस्सार, हरीयाणा येथील, तोच कार्ड पश्चिम बंगालच्या 63 राणीगंज या विधानसभा मतदार संघाचा. तसेच तोच ईपीक कार्ड राणीगंज विधानसभा मतदार संघातील मुस्लीम महिलेचा. पश्चिम बंगालमध्ये असलेला मुस्लीम मतदार हा भारतीय जनता पार्टीचा नाही म्हणून ही पध्दत नवीन प्रकारे अंमलात आणण्याचा प्रकार घडला आहे. यावरून हरीयाणा, महाराष्ट्र, दिल्ली येथे निवडणुकांमध्ये गोंधळ झाला हे निश्चित झाले. या गोंधळाची सारवा सारव करतांना मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश्र्वरकुमार यांनी अत्यंत शातिरपणे उत्तर देत ईपीक नंबरमध्ये झालेला हा घोळ मान्य केला. पण त्यामुळे बोगस मतदान करता येणार नाही असे सांगून यावर सारवा सारव केली. उदाहरण आज एका मतदार संघाचे असले तरी पश्चिम बंगालच्या सर्व विधानसभा मतदार संघाचे सर्व्हेक्षण केले तर किती मोठा घोळ समोर येईल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईपीक क्रमांक एक्सवायझेड 0999615 यावर सुमन रामपाल (34) असे नाव असून ते पश्चिम बंगालच्या 63 राणीगंज विधानसभा मतदार संघातील आहे. ईपीक क्रमांक तोच त्यावर सुध्दा सुमन रामपाल(34) हिस्सार हरीयाणा अशी नोंद आहे. तसेच याच ईपीक क्रमांकावर तिसरे नाव आहे ते नाव नुरजहा निसार शेख (34) आणि हे नाव सुध्दा 63 राणीगंज विधानसभा मतदार संघात आहे. राणीगंज विधानसभा मतदार संघामध्ये असे 168 मतदार आहेत. तसेच या मतदार संघातील मुस्लीम मतदारांना टार्गेट करण्यासाठी हिंदु मतदार येथे आयात केलेले दिसतात. त्यात मुस्लीम मतदारांची संख्या 84 आहे. याची तक्रार केल्यानंतर मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी अत्यंत शातिरपणे याचे उत्तर दिले. ते उत्तर पाहिले तर ते राजीवकुमार यांच्या एक पाऊल पुढे आहेत असे दिसते. असतील ही कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ते अत्यंत निकटचे आहेत. वाचकांना समजावे म्हणून आम्ही असे सांगू इच्छीतो की, ज्ञानेशकुमारने नरो वा कुंजर वा अशी भुमिका घेत हरीयाणा मतदार पश्चिम बंगालमध्ये मतदान करू शकत नाही असे सांगून या प्रकरणाची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू ज्या दिवशी पश्चिम बंगालच्या राणीगंज विधानसभा मतदार संघामध्ये मतदान होईल त्या दिवशी नुरजहा च्या जागी सुमन रामपाल मतदान करेल आणि नुरजहा मतदानालाा येईल तेंव्हा तुमचे मतदान झाले आहे असे सांगितले जाईल हा आहे यातला मुख्य खेळ. असे 10-12 लाख मतदार बदलले तर निवडणुकीचा निकाल काय येईल हे आम्ही लिहिण्याची काही गरज नाही.


यावरून हरीयाणा, महाराष्ट्र, दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा जनतेने दिलेला नाही हे निश्चित झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना पाळले जात नाही. सी-17 या परिशिष्टाची तुलनात होत नाही. 13 लाख मतदार एका रात्रीत वाढतात मग निवडणुक घेण्याची गरजच काय आहे. हा प्रश्न तयार झाला आहे. दिल्लीच्या सेंट्रल दिल्ली हा विधानसभा मतदार संघ दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आहे. त्या मतदार संघातून 38 हजार मतदार समाप्त झाले आहेत. दिल्लीमध्ये तर अनेक वस्त्या मतदान यादीतून गायब आहेत. लोकसभा निवडणुकीत 70 जागांवर भारतीय जनता पार्टीने खेळ केला होता. तो खेळ केला नसता तर भारतीय जनता पार्टी 180 खासदारांसह शिल्लक राहिली असती. त्यानंतर मात्र त्यांनी झालेल्या सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये हा खेळ केला आणि हा डाटा खेळ ममता बॅनर्जीने उघडकीस आणला. मतमता बॅनर्जीने केलेल्या तक्रारीतील सुमन रामपाल या महिलेचा अभ्यास केला तर कधीकाळी 12 वर्षापुर्वी झालेल्या कुंभमेळ्यात हरवलेली जुळी बहिण परत भेटली काय हा आभास होतो. पण भेटली असेल तरी नवऱ्याचे नाव एकच कसे असते. ईपीक नंबरला युनिक आयडीकार्ड असे म्हणतात. युनिक या शब्दाचा अर्थ अद्वितीय, याच्या सारखे दुसरे नाही असा होतो. या युनिक शब्दाची वाट लावत तीन ईपीक नंबर एकच आहेत असे दिसते आहे.पश्चिम बंगालमधील मुस्लीम मतदार हा ममता बॅनर्जीचा आहे म्हणून त्यांना टार्गेट केलेला हा प्रकार आहे.


या संदर्भाने न्यायालयाचा विचार करू तर न्याय पालिकेवर लिहिणे म्हणजे आपला वेळ नष्ट करणे आहे. चोरी करणाराच चोर-चोर असे ओरडत पळत सुटला अशी ही परिस्थिती दिसते आहे. ममता बॅनर्जीने तक्रार केल्यानंतर त्यांच्या विरुध्द सुध्दा भारतीय जनता पार्टीने तक्रार केली आणि त्यांच्या तक्रारीनुसार ममता बॅनर्जी निवडणुकीत घोळ करणार आहेत. पण तो घोळ कसा करतील याचा काही उल्लेख भारतीय जनता पार्टीच्या तक्रारीत नाही. उलट ममता बॅनर्जीने डाटा उघड केला आहे. म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीमध्ये जास्त दम दिसतो. आता न्याय पालिकेऐवजी जनतेने याची दखल घेण्याची गरज आहे. पुढे कधी तरी 25-30 वर्षानंतर कोणी तर एक विद्वान व्यक्ती असा दावा करेल की, निवडणुक आयोगाच्या कार्यालयाच्याखाली लोकशाहीचे मंदिर दबलेले आहे ते बाहेर काढा अशा पध्दतीचा कारभार निवडणुक आयोग करत आहे. हरीयाणा निवडणुकीवेळी असे सांगण्यात येत होते की, हरीयाणाचा मतदार सहन करणार नाही. तो पाठीचा कणा तोडून टाकण्याची ताकत ठेवतो. पण इतर राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे स्लिपर सेल कार्यरत आहेत. म्हणून हरीयाणात काही घडले नाही. आजच्या नंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पहिली निवडणुक बिहारची आहे. तेथे हा सर्व खेळ झालेला आहे. तयारी आता पश्चिम बंगालची सुरू आहे. इंग्राजांनी सुध्दा भारतात आपले साम्राज्य पसरवितांना सुरूवात पश्चिम बंगालपासून केली होती. भारतीय जनता पार्टीला सुध्दा तसेच करायचे आहे.
या सर्व प्रकारावर प्रसिध्द हास्य कवी सुरेंद्र शर्मा यांनी सांगितलेल्या काही घटना आम्ही उल्लेखीत करू इच्छीतो. अयोध्येत राम मंदिर तयार करण्यात आले. त्यावेळी एका व्यक्तीने सुरेंद्र शर्मा यांना विचारले होते तुम्हाला आणि भगवान श्री रामांना तराजुच्या दोन पालड्यात बसवले तर कोणता पालडा वजनदार असेल तर सुरेंंद्र शर्मा यांनी उत्तर दिले होते की माझा पालडा वजनदार असेल. याचे कारण सांगतांना सुरेंद्र शर्मा सांगतात. प्रभु श्री रामचंद्राच्या पालड्यात ते एकटे असतील. माझ्या पालड्यात मी असेल आणि माझ्या आत वसलेले प्रभु श्री राम असतील. म्हणून माझा पालडा जास्त जड असेल. सुरेंद्र शर्मा सांगतात राम मंदिर बनले तेंव्हा प्रभु श्री रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा, श्री रामाची प्राणप्रतिष्ठा असा प्रचार आणि प्रसार झाला. बॅनर लागले, गोदी मिडीयाने सुध्दा हेच सांगितले. परंतू सुरेंद्र शर्मा यांच्या सांगण्याप्रमाणे प्रभु श्री रामचंद्रांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होती. श्री रामाची प्राणप्रतिष्ठा कशी करणार म्हणून सुरेंंद्र शर्मांच्या मते देशात मंदिर बनविण्याऐवजी देशालाच मंदिर बनवा म्हणजे काही चुकीचे होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!