नांदेड(प्रतिनिधी)-आज माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त ए.जे.गु्रपच्यावतीने आयटीआय जवळील महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर मिठाई वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला.
आज माता रमाई आंबेडकर यांचा 127 वा जन्मोत्सव साजरा करतांना ए.जे. गु्रपच्यावतीने सायंकाळी 4 वाजता आयटीआय चौकात तथागत गौतम बुध्द, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमांचे पुजन करून प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी भदंते पय्याबोधीजी आणि इतर भंतेजी यांच्यासह पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल हजर होते. त्यानंतर ए.जे.गु्रपच्यावतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
ए.जे.गु्रपच्यावतीने या कार्यक्रमासाठी अंजिक्य वाघमारे, अतुल चौंदते, मनिष कांबळे, सोनु शंकपाळ, स्वप्नील बुक्तरे, कुंदन सुर्यतळ, दक्षक सरोदे, सुभाष कांबळे, निहाल अटकोरे, शैलेश सरोदे, सुर्यवंशी अनेक युवकांनी मेहनत घेतली.
ए.जे. ग्रुपच्यावतीने आयटीआय चौकात माता रमाई आंबेडकर जन्मोत्सवानिमित्त मिठाई वाटप
