नांदेडचे नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शासनाने 13 भारतीय प्रशासनिक सेवेतील सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे सहआयुक्त वस्तू व सेवा कर छत्रपती संभाजीनगर येथे जात आहेत. त्यांच्या जागी संचालक कार्यालय सिडको येथील भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी राहुल काशिनाथ कर्डिले यांना नांदेडचे जिल्हाधिकारी पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून नियुक्ती दिली आहे.
राज्य शासनाने 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवीन नियुक्त्या मिळालेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. 1998 च्या बॅच प्रविण दराडे यांना प्रिन्सीपल सेकरेटरी टेक्सटाईल डिपार्टमेंट मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. 2002 बॅचे अधिकारी पंकजकुमार यांना सचिव विशेष चौकशी अधिकारी सर्वसामान्य विभाग मंत्रालय मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. 2007 बॅचचे अधिकारी नितीन पाटील यांना रोजगार विभागात आयुक्त या पदावर नवी मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. सन 2009 बॅचच्या अधिकारी श्वेता सिंघल यांना विभागीय आयुक्त अमरावती विभाग येथे नियुक्ती दिली आहे. 2009 बॅचचे अधिकारी डॉ.प्रशांत नारवरे यांना राज्यपालांचे सचिव अशी नियुक्ती मिळाली आहे. 2010 बॅचचे अधिकारी अनिल भंडारी यांना संचालक माहिती तंत्रज्ञान मुंबई या पदावर नियुक्ती दिली आहे. सन 2011 बॅचचे अधिकारी पी.के.डांगे यांना सचिव मानवी हक्क आयोग या पदावर नि युक्ती देण्यात आली आहे. सन 2013 बॅचचे अधिकारी राममुुर्ती यांना उपसचिव राज्यपालक अशी नियुक्ती मिळाली आहे. सन 2013 बॅचचे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राजेंद्र राऊत यांना सहआयुक्त वस्तु व सेवाकर विभाग छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती दिली आहे. सन 2013 बॅचचे अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांना अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती दिली आहे. 2015 बॅचचे अधिकारी राहुल काशिनाथ कर्डिले यांना नांदेडचे जिल्हाधिकारी पद वरिष्ठ समयश्रेणी अवनत करून नांदेडला नियुक्ती दिली आहे. 2015 बॅचचे अधिकारी माधवी सरदेशमुख यांना कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण या पदावर मुंबईमध्ये नियुक्ती मिळाली आहे. 2022 बॅचचे अधिकारी अमित राजन यांना पांडरकवडा प्रकल्प अधिकारी पांडरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी केळापूर उपविभाग जिल्हा यवतमाळ येथे नियुक्ती दिली आहे.
राज्यात 13 भारतीय सेवेतील प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या बदल्या
