नांदेड(प्रतिनिधी)-अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर यांच्या आदेशानुसार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोतराव पोले सर यांच्या मार्गदर्शनानुसार या स्नेहसंमेलनाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. दिनांक 26 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 या दरम्यान विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या संमेलनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन केले. याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धा, आनंद नगरी, वादविवाद, वक्तृत्व, काव्यवाचन, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, गीत गायन, नृत्य प्रकारच्या कलांचा समावेश होता. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्गाच्या विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. नियमांना धरून व आनंद पूर्ण वातावरणात ह्या सर्व स्पर्धा ठरल्याप्रमाणे निरपेक्ष पद्धतीने पार पडल्या. 1 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील, पाथरी विधानसभा मतदरसंघातील आमदार राजेश विटेकर, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टे साहेब, संस्थेचे सचिव कृष्णा भैया दळणर व पिंपलदरी पोलोसस्टेशन चे पोलीस अधिक्षक सूर्यवंशी साहेब, नांदेड चे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. शिवाजी हाके, महाविद्यालयाचे प्राचार्य कातराव पोले या सर्व जेष्ठ, विचारवंत व अनुभवी अशा व्यक्तींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी गीत गायन या प्रकारात संगीत विभातील अंध विद्यार्थीनी कु. रुपाली गवळी ही अनेक संगीत प्रेमी रसिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरली. त्याच प्रमाणे संगीत विभागाचा माजी विद्यार्थी सचिन जाधव यानेही लोकगीत सादर करून सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. हा संपूर्ण कार्यक्रम शिस्तीत व आनंद पूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्वच प्राध्याकांनी परिश्रम घेतले.