नांदेड (प्रतिनिधी)-दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता दातार चौक या भागातून बालाजी धोंडीबा मच्छरलावार हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे बनावट ओळखपत्र दाखविले आणि त्यांच्या गळ्यात असलेले लॉकेट व सोन्याची अंगठी काढायला लावली. आणि ते १ लाख ५ हजार रुपयांचे साहित्य एका कागदाच्या पुडीत बांधून त्यांना परत दिले. बालाजी मच्छरलावार यांनी ती कागदाची पुडी उघडून पाहिली असता ज्यात फक्त खडे होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्र.३५/२०२५ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत.
More Related Articles
महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीला अटक करून 16 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल; भाग्यनगर पोलीसांची गतीमान कामगिरी
नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एक गंभीर प्रकार घडला.…
गोळीबाराने पुन्हा एकदा नांदेड हादरले ; एकाचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6…
दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालणार – राहुल साळवे
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था असो की नागरी स्वराज्य संस्था असो कि संजय गांधी…
