बिलोली (प्रतिनिधी)- बिलोली पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सुमारे 2 लाख 20 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 13 मार्च रोजी सकाळी करण्यात आली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरदारनगर परिसरात इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. छाप्यात रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 2,20,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी योगेश नागोराव बडवे (वय 39), शिवराज नागनाथ दुडले (वय 30), गुंडप्पा इरप्पा चौगुले (वय 29), शेख पीर अहेमद गुड्डूमिया (वय 38), सुनील बाबुराव वाघमारे (वय 41) आणि शेख सुलेमान शेख बाबू (वय 32) या सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले,पोलीस उप निरीक्षक तिडके,पोलीस अंमलदार शेख,अंबुरे,धूमपतवाड यांनी केली. दरम्यान, अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 623 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 23 मार्चला नागपूरातील आरएसएस मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा – ॲड.प्रकाश आंबेडकरांचा एल्गार नांदेड ग्रामीण पोलिसांची रेती तस्करांवर कारवाई- 40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त