नांदेड (प्रतिनिधी)-दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता दातार चौक या भागातून बालाजी धोंडीबा मच्छरलावार हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे बनावट ओळखपत्र दाखविले आणि त्यांच्या गळ्यात असलेले लॉकेट व सोन्याची अंगठी काढायला लावली. आणि ते १ लाख ५ हजार रुपयांचे साहित्य एका कागदाच्या पुडीत बांधून त्यांना परत दिले. बालाजी मच्छरलावार यांनी ती कागदाची पुडी उघडून पाहिली असता ज्यात फक्त खडे होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्र.३५/२०२५ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे अधिक तपास करीत आहेत.
More Related Articles
“भवनी झाली नाही… मी नंतर येतो!” माणुसकी अजून जिवंत आहे का?
सकाळची वेळ होती. दुकान उघडून नेहमीप्रमाणे देवासमोर अगरबत्ती लावत होतो. त्या शांत क्षणात अचानक साधारण…
कंधारच्या जिल्हा न्यायाधीशांचा मोबाईल पोलीसांनी शोधला; सासु सुनेला लुटणारा एक चोरटा गजाआड वजिराबाद पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी)-1 जून रोजी खुराणा ट्रव्हल्सजवळून कंधारचे जिल्हा न्यायाधीश अभिताब पाचभाई यांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला वजिराबाद…
जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यानेच जल जीवन मिशनच्या 7 लाखाचा अपहार केला
नांदेड(प्रतिनिधी)-उपअभियंत्यानेच जलजीवन मिशन कार्यक्रमाचे 7 लाख रुपये स्वत:साठीच वापरून केलेला एक अपहार उघडकीस आला आहे.…
