नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार प्रकाश राठोड यांना एक मोबाईल फोन सापडला आहे. हा मोबाईल लॉक असल्याने त्यातील माहिती तपासता येत नाही. त्यामुळे या मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी मोबाईलचा फोटो प्रसिद्ध करण्यात येत आहे. पोलिस अंमलदार प्रकाश राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मोबाईलवर वास्तव न्यूज लाईव्हचे संदेश येत आहेत. त्यामुळे हा मोबाईल वास्तव न्यूज लाईव्हशी संबंधित असलेल्या एखाद्या व्यक्तीचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीचा हा मोबाईल असेल, त्यांनी इतवारा पोलिस ठाण्यातील पोलिस अमलदार प्रकाश राठोड यांच्याशी संपर्क साधून मोबाईलची ओळख पटवून तो ताब्यात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क : पोलिस अंमलदार प्रकाश राठोड, इतवारा पोलिस ठाणे मोबाईल क्रमांक : ९७६४१२८१०२ Kanthak Suryatal Post Views: 31 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ५ हजारांची लाच स्वीकारणारा तलाठी जेरबंद नांदेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल!