भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या वाहणांवर आपले जीवन चालविणाऱ्या एका पत्रकाराने महाकुंभमध्ये झालेल्या मृत्यूंवर कोण आनंदी आहेत असे दाखवत काही ट्विट दाखवले. पण एका हज यात्रेमध्ये उष्णतेने 90 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस हसणाऱ्यांचे नावे या पत्रकाराला दाखवायला लाज वाटली काय? बरे झाले मुस्लिम समाजाची कुंभमेळ्यात यंदा इंट्री बॅन होती. नसता झालेल्या दुर्घटनेचे व्हिलन मुस्लिमांनाच ठरवले गेले असते. म्हणून मुस्लिम समाजाने योगी आदीत्यनाथ यांचा एक जाहीर सत्कार करायला हवा.
कुंभमेळ्यातील घटनांचे कवित्व संपत नाही, संपणार पण नाही कारण मी चांगला, आमचे काही चुकले नाही असे सांगण्यातच सर्व गर्क आहेत. कुंभमेळ्यात हजर असलेले शंकराचार्य अभिमुक्तेश्र्वरानंदजी हे बोलतांना त्यांचे शब्द, त्यांचे डोळे आणि त्यांचा आवाज कुंभमेळ्यातील घटनेचे दु:ख सांगत होता. ते व्यक्त करत होते की, आम्हाला खरी माहिती दिली असती तर आम्ही शाही स्नान केले नसते, उपवास ठेवला असता कारण आमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला तर जेवण करता येत नाही आणि त्यांनी त्वरीत प्रभावाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. कारण भगवे कपडे घालून खोटे बोलणारा योगी आदित्यनाथने आम्हाला धोका दिला आहे. या यात्रेतील चेंगरा चेंगरीत लुट झाली आहे. ज्यांना श्वास घेता येत नव्हता त्यांच्यासाठी ऑक्सीजन नव्हते असे अनेक दु:ख शंकराचार्यजींनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या पायताणाखाली जगण्याचा आनंद घेणाऱ्या आज तकचे पत्रकार सुधीर चौधरी यांनी कुंभमेळ्यात झालेल्या मृत्यूंवर कोण आनंदी आहे. हे दाखवतांना काही ट्विट दाखवले. त्यात बऱ्याच मुस्लिम समाजाच्या लोकांची नावे होती. त्यांनी हसणारे इमोजी घटनेवर पोस्ट केले होते. असे एकदा हज यात्रेमध्ये उष्णतेमुळे 90 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हसणारे इमोजी टाकणारे कोण होते. हे दाखवायला सुधीर चौधरीला ला वाटली होती काय? असा प्रश्न उपस्थिती होतो. खरे तर हज यात्रेतील गर्दी नियंत्रीत कशी केली जाते. हे पाहायला हवे. कारण एकाच दिवशी 30 लाख लोकांना सर्व धार्मिक कार्यक्रम करायचे असतात. हज यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली नाही. दुर्घटना तेथे सुध्दा घडलेल्या आहेत. काही वर्षांपुर्वी तेथे सुरू असलेल्या बांधकामाच्या एका क्रेनवर वीज पडली आणि त्यामुळे अनेक देशातील नागरीक भाविकांचा मृत्यू झाला. त्यात भारताचेही लोक होते. मरणाऱ्याला करोडो रुपयांची नुकसान भरपाई फक्त काही दिवसांत मिळाली होती. सोबतच त्या मरण पावलेल्या लोकांच्या कुटूंबियांना मोफत हज यात्रा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्या कंत्राटदाराची तर अवस्था ऐवढी दुर्देवी करण्यात आली की, त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आणि महत्वाची बाब म्हणजे तेथे करोडोंची कामे करणारा तो कंत्राटदार एका निविदेसाठी फक्त एक दिरम (सौदी अरबीयातील 1 रुपया)एवढीच रक्कम घेत होता. करता येईल का भारतात असे? कुंभमेळ्यात चेंगरा चेंगरी झाल्यानंतर रोशन बाग या परिसरात मुस्लिम समाजानेच कुंभमेळ्यातील भाविकांसाठी जेवणाची सोय केली हे विसरता येईल काय? हिंदु-मुस्लिम करण्यात पारंगत असणाऱ्या आज तकचे पत्रकार सुधीर चौधरीला ही जेवणाची सोय दिसली नाही काय? म्हणूनच बरे झाले की, योगी सरकारने यंदाच्या कुंभमेळ्यात मुस्लिमांना प्रवेश बंद केला होता. नाही तर घडलेल्या घटनेचे सर्वात मोठे व्हिलन त्यांनाच ठरविले गेले असते. हसण्याबद्दल बातमी करणाऱ्या सुधीर चौधरीला एक फोटो दिसलेला नाही जो व्हायरल झालेला आहे. घटना घडल्यानंतर काही प्रशासनिक अधिकारी जखमींना भेटून परत येत असतांनाचा तो फोटो आहे. त्यात 1990 बॅचचे आयएएस अधिकारी आणि उत्तर प्रदेश आरोग्य विभागाचे सचिव पार्थ सारथी सेन शर्मा हे आपले दात विचकत चाललेले आहेत. मग एवढ्या दु:ख घटनेत त्यांचे दात सुधीर चौधरीला दिसले नाहीत काय?
उत्तर प्रदेश प्रशासनातील एक पोलीस अधिकारी एका संताच्यावतीने भाविकांसाठी तयार होत असणाऱ्या जेवणात माती टाकतो आहे. असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या पोलीसाला पुढे निलंबितही करण्यात आले. पण ते जेवण तयार करणारे संत आरोप करत होते की, मला दहा हजार रुपये मागितले आणि मी दिले नाही म्हणून तुझ्या जेवणामुळे चेंगरा चेंगरी होईल असे सांगत त्या पोलीसाने जेवणात माती टाकली आणि ज्या ठिकाणी चेंगरा चेंगरी झाली त्या ठिकाणी पोलीसच नव्हते.20 किलोमिटर पायी चालणाऱ्या मोठ्या गर्दीसाठी मोठी कुमक होती. पण ज्या ठिकाणी भाविकांना आता शेवटचा क्षण आहे त्या ठिकाणी पोलीसांची उपस्थिती नव्हती. कारण ते सर्व व्हीव्हीआयपींच्या शाही स्नानाचा बंदोबस्त करत होते. जेव्हा गर्दी पळाली तो व्हिडीओ पाहिला तर असे दिसते की, घटना कशी घडली असेल. बहुदा त्या व्हिडीओमध्ये सुध्दा खाली पडलेल्या लोकांवरून गर्दी पळत असेल.
सोर्स – बोलता हिंदूस्थान, लाईव्ह टीव्ही आणि टीसीएच