नांदेड(प्रतिनिधी)-गृहवस्तीच्या व्यवसायात भागिदारी देतो असे म्हणून लहान येथील पती-पत्नीने 7 लाख 50 हजार 29 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आता अर्धापूर पोलीसांनी गुन्ह्यात नोंद केला आहे.
आंबेगाव ता.अर्धापूर येथील मोहन देवराव कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 ऑक्टोबर 2022 ते 16 मार्च 2023 दरम्यान मौजे लहान ता.अर्धापूर येथील शामराव किशनराव साळुंके आणि त्यांच्या पत्नी अर्चना शामराव साळुंके यांनी संगणमत करून मोहन कोकाटेला गृहवस्तीच्या व्यवसायात भागिदारी देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले.फोन पे आणि आरटीजीएसच्या माध्यमातून 7 लाख 50 हजार 29 रुपये घेण्यात आले होते. अर्धापूर पोलीसांनी ही तक्रार गुन्हा क्रमांक 38/2025 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 34 नुसार दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार नरवाडे हे करणार आहेत.