लहान बालकांनी सोशल मिडीया वापरू नये त्यासाठी कायद्याची गरज-खा.डॉ.अजित गोपछडे

नांदेड(प्रतिनिधी)-16 वर्षांच्या बालकांना सोशल मिडीयापर्यंत पोहचता येवू नये यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे असे पत्र नांदेडचे खा.डॉ.अजित गोपछडे यांनी राज्यसभेच्या सचिवांना दिले आहे. देशाच्या तांत्रिक मंत्रालयाला सुध्दा या कायद्यासाठी अर्ज दिला आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून हैरान करणाऱ्या अनेक घटना देशात घडत आहेत. ज्यामध्ये बैंगलूरू येथे कामावरून घरी जणाऱ्या एका दहा वर्षीय बालकाने केलेले लैगिंक अत्याचार देशभर गाजले आहे. या घटनेवर देशभर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियामध्ये त्या बालकाला माफ करण्यात यावे, तो बालक आहे. त्याचा उद्देश तसा नव्हता अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. सोबतच एका मुस्लीम युवकाच्या रुपात खोटी ऑनलाईन ओळख बनवून प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली आहे. त्याने ती खोटी फेसबुक आयडी बीजेपीच्या एका आमदाराला धमकी देण्यासाठी वापरली होती. सन 2021 मध्ये एका अनुमानानुसार देशात 1 लाख बालक सोशल मिडीया प्लॅटफॉमवर योन अत्याचाराचे आहेत. 3 हजार 400 पेक्षा जास्त शाळेतील बालकांवर हा अन्याय केला गेला आहे. यातील 42.9 टक्के लोकांचे सोशल मिडीयावर खाते आहे. ही सर्व आकडेवारी अध्यक्ष राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाद्वारे प्रसारीत केलेले आहे. त्यासाठी एकदम सहजपणे असे सोशल मिडीयाचे खाते बालकांना तयार करता येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 10 वर्षाची बालके सुध्दा सोशल मिडीयावर आता सक्रीय झाली आहेत. सोशल मिडीयावर खोटे प्रोफाईल बनविण्याचे लाखो प्रकार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसदेने सोशल मिडीयामुळे होणाऱ्या प्रभावावर चर्चा करण्यासाठी संयुक्त समितीचे गठण केले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांचा सोशल मिडीया उपयोग प्रतिबंधीत करण्यासाठी सुध्दा योजना आखली आहे. आपल्या देशात सुध्दा अशाच प्रकारचा कायदा व्हावा अशी अपेक्षा राज्यसभेचे खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!