आज सगळीकडे मांडलेल्या वैचारिक मुद्यांना गुद्याने उत्तर दिले जाताना दिसते. मग ते मराठा ,ओबीसी ,धनगर आरक्षण असो की वंचितांचे प्रश्न असोत. त्या बेकायदेशीर घटनांचा धिक्कार करायला पाहिजे .
अलीकडे बहुजन विचारवंत ज्ञानेश महाराव यांना दडपणाखाली माफी मागायला लावली. त्याचा धिक्कार करण्यासाठी मुंबई येथे एका निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यास आमचा पाठिंबा आहे. त्याचवेळी जेष्ठ विचारवंत व समाज सुधारक श्याम मानव यांच्या कार्यक्रमात देखील गोंधळ घालण्यात आला होता पण श्याम मानव यांची मांडणी खूप अभ्यासपूर्ण व तर्क शुद्ध होती व त्यांनी आपला शत्रू नक्की कोण आहे हे दाखवून त्यांचा बुरखा फाडला ही कौतुकास्पद बाब आहे.
महाराव यांच्या घटनेच्या निमित्ताने बहुजनांच्या पुरोगामी चळवळीकडे पुन्हा नव्याने पाहण्याची गरज वाटते. गेली अनेक वर्ष महाराव आपली हीच परखड भूमिका मांडत आहेत त्याचे काय परिणाम होतील याची त्यांना कल्पना नक्कीच असेल.शिवाय दडपण करणाऱ्या गुंडांची टोळी आत आल्यावर माझी मते काय आहेत त्याबद्दल आपण अगोदर चर्चा करू. तुम्ही ती खोडून काढा असा संवाद झाल्याचे निदान त्या व्हिडिओवरून दिसत नाही. वक्तव्यावर टीका झाली किंवा काही गुन्हे दाखल झाले आणि त्यांना वाटले की आपण काही चुकीचे बोललो तर त्यांनी तात्काळ त्याच वेळी जाहीर माफी मागायला हवी होती मग गुंडांच्या हातात सूत्रे गेली नसती. ज्यांनी महारावांना बोलवले त्यांची भूमिका समजली नाही. महारावानी स्वामी, राम याबद्दल केलेली वक्तव्य ही मला आता तर्कशुद्ध logical व योग्य वाटतात. चाळीस वर्षांपूर्वी ती मला माझी धार्मिक भावना दुखावणारी वाटत होती. राम शाम शोध दरोडे खोरांचा हे माझं पहिलं पुस्तक पु ल देशपांडे यांना दिले व विनंती केली की “आमच्या मोरगावला अष्टविनायक गणपतीला अवश्य या”. ते पुस्तक चाळत म्हणाले “मी मूर्ती पूजा मानत नाही” मला प्रचंड राग आला. सगळं जग आमच्या गणपतीला मानतं आणि हा कोण टिकोजीराव आमच्या देवाविरुद्ध बोलणारा? असे मनोमन वाटले. ती भावना घालवायला मला पुढील 40 वर्षे लागली. स्वामी चरित्र व रामायण हे या भक्तांनी लिहिलेले नाही. ते लिहिलेले आहे ते स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या व आमचे शोषण करीत पोट भरणाऱ्या ब्राह्मणांनी. आम्ही सगळे भावना दुखावलेले लोक हे त्यांनी लिहिलेल्या या काल्पनिक लिखाणाचे व या बामणी काव्याचे बळी victim आहोत.
आम्ही जाहीरपणे हे प्रश्न या ब्राह्मणांना विचारले पाहिजेत. कॉलेज जीवनापासून मी या चळवळीत सक्रिय आहे. पोलीस मध्ये जाण्या अगोदर जेलमध्ये गेलो होतो युक्रांत मधून विद्यार्थी आंदोलक म्हणून. त्यानंतर अनेक पुरोगामी प्रतिगामी आंदोलने हाताळली. व आताही मी क्रियाशील आहे.परंतु दुर्दैवाने पुरोगामी चळवळीतील लोक ब्राह्मणाचे नाव घ्यायला धजावत नाहीत. वारकरी सांप्रदायातील अनेक जण आपल्याला कीर्तनाची सुपारी मिळणार नाही किंवा आपले दुकान चालणार नाही म्हणून ब्राह्मणाचे नाव वगळतात. तर आपल्याला सत्ता मिळणार नाही म्हणून राजकारणी ब्राह्मण शब्द उच्चारून आपली जीभ विटाळून घ्यायचे टाळतात. महाराष्ट्रातील बहुतेक पुरोगामी चळवळींची सुरुवात व नेतृत्व स्वतःला ब्राह्मण म्हणणारे करीत आहेत. ते धूर्तपणे ब्राह्मण श्रेष्ठत्व व त्यांनी केलेले शोषण मुद्दा टाळतात. त्याबद्दल मी अनेकांना आव्हान दिलेले आहे. अहो बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी उच्चतम न्यायालयाच्या न्यायाधीशाला देव्हाऱ्या पुढे हात जोडून बसावे लागते तिथे या पुरोगामी नेत्यांची काय किंमत?मानवी उत्क्रांती नतर चार बुक शिकलेली माझी ही पहिली पिढी.
खरे तर अंधश्रद्धा पूर्ण ,विकृत, दिशाहीन लिखाण हे ब्राह्मणांनी केलेले आहे त्यांना प्रश्न विचारू या. बाकी सगळी बहुजन जनता ही या ब्राह्मणांनी विकृतपणे लिहिलेल्या काल्पनिक लिखाणाची बळी (victims)आहेत त्यांना आणखी झोडपून काही साध्य होणार नाही. उलट ते तुमचे शत्रू बनत आहेत व त्यांच्या गोटात सामील होत आहेत. दाभोलकर व पानसरे यांचेवर हल्ला करणारे बहुजन होते. मास्टर माईंड कोण होते?
करूया वारकरी धर्म बनशाली बलशाली करूया पुरोगामी चळवळी बलशाली या बॅनर खाली आम्ही गेले काही वर्ष काम सुरू केलेले आहे. अतिशय गुंतागुंतीच्या complex व अवघड difficult जगण्याच्या अवस्थेत हा बहुजन समाज उत्तरे शोधत आहे. पण या ब्राह्मणी शक्तीने फार साधी व स्वतःच्या हिताची उत्तरे देऊन त्यांना कर्मकांडात अडकवून टाकलेला आहे. अशा प्रकारे बळी ठरलेल्या बहुजनांची टिंगटवाळी करण्यापेक्षा योग्य दिशा दाखवायची लागेल. त्या अगोदर त्यांना त्यांचा ब्राह्मण हा शत्रू दाखवावा लागेल.
सुरेश खोपडे