नांदेड(प्रतिनिधी)-मौजे लहान येथे एका घरातून झालेली 3 लाख 65 हजार 875 रुपयांची चोरी अर्धापूर पोलीसांनी 24 तासात उघड केली आहे. चोरी करणाऱ्या महिलेला आज अटक करण्यात आली.
प्रभाकर दत्ता बादलवाड यांच्या घरी मंजुषा गजानन मोरे ही युवती कामगार होती. बादलवाड पत्ती-पत्नी शेतात गेल्यानंतर त्या घराला कुलूप लावून त्या कुलूपाची चाबी मंजुषाला सापडेल अशा ठिकाणी ठेवली जात असे. काही दिवसांपुर्वी या घरातील मालकीन बाईने मंजुषा मोरेला आपले दागिणे दाखवले होते. कामगार महिला असलेल्या मंजुषा मोरेचा प्रेम विवाह काही दिवसात होणारच होता. तिने घरात पाहिलेल्या सोन्याच्या दागिण्यांना 4 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान कधी तरी चोरून नेले आणि ती त्यांच्याच घरी काम करत राहिली. 17 ऑक्टोबरला आपले दागिणे चोरीला गेल्याची माहिती समजल्यानंतर प्रभाकर बादलवाड यांनी तक्रार दिली.
अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरिक्षक सुरेश भोसले, पोलीस अंमलदार संदीप आणेबोईनवाड, विजय आडे, विजय डांगे, इंदु गवळी यांनी मंजुषा गजानन मोरेला ताब्यात घेवून विचारणा केली असता तिने चोरलेले 3 लाख 65 हजार 875 रुपयांचे सोन्याचे दागिणे काढून दिले आहेत. आज चोरी करणाऱ्या मंजुषा मोरेला अर्धापूर पोलीसांनी अटक केली आहे.
चोरीच्या घटनेतील 100 टक्के रिकव्हॅरी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक डॅनिअल बेन यांनी अर्धापूर पोलीसांचे कौतुक केले आहे.