नांदेड(प्रतिनिधी)- मौजे गोरठा ता.उमरी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. दुसऱ्या एका घटनेत पिरबुऱ्हाणगल्लीमध्ये एका मोटारसायकलला आडवून काही चोरट्यांनी 2 लाख 75 हजार रुपये रोख रक्कमेची जबरी चोरी केली आहे. गंगाधर राजाराम गोमासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे गोरठा ता. उमरी येथे त्यांचे घर आहे. दि .10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून अलमारीचे लॉकर तोडले आणि त्यात ठेवलेले 1 लाख 17 हजार 500 रुपये किंमतीचे दागिणे चोरून नेले आहेत. उमरी पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा क्रमांक 345/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक आरमाळ अधिक तपास करीत आहेत. राजेश नारायण सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजता ते आपल्या दुचाकी गाडीने पिरबुऱ्हाणगल्लीमधून जात असतांना चार जणांनी त्यांच्या दुचाकी गाडीसमोर गाडी आडवी लावून त्यांना थांबवले . त्यांच्या दुचाकीची चाबी काढून घेतली आणि त्यांच्या पाठीवर लटकवलेल्या सॅक बॅगमध्ये असलेली 2 लाख 75 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 516/2024 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक केजगिर हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 856 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिलेने महिलेला खंडणीसाठी केला फोन सोयाबीनचे पिक चोरले